बाबासाहेबांच्या जाणता राजा नाटकात काम केलेल्या कलाकारांनी सांगितली सुंदर आठवण...

जाणता राजा या महानाट्यामध्ये रमेश जाधव या गृहस्थाने आपली दोन्ही मुलं अभिनयासाठी बाबासाहेबांकडे सोपवली होती. या आठवणींना त्यांनी सामटीव्हीशी बोलताना उजाळा दिलाय.
बाबासाहेबांच्या जाणता राजा नाटकात काम केलेल्या कलाकारांनी सांगितली सुंदर आठवण...
बाबासाहेबांच्या जाणता राजा नाटकात काम केलेल्या कलाकारांनी सांगितली सुंदर आठवण...दिलीप कांबळे

मावळ, पुणे: नामवंत साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, व्याख्याते, महाराष्ट्रभूषण पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पहाटे पाच वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तके लिहिली होती. (Artists who acted in Babasaheb's Jaanta Raja Natak shared beautiful memories)

हे देखील पहा -

जाणता राजा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाटकही लिहिलं आणि सदरही केलं. मात्र मावळमधील तळेगाव दाभाडेमधील नागरिकांसोबत1980 सालापासून त्याचें वेगळेच ऋणानुबंध जुळले होते. मावळात अनेक गड-किल्ले आहेत. तिकोना तुंग, राजमाची लोहगड या किल्ल्यावर ते मावळ्यांना घेऊन जाऊन तेथील शिवाजी महाराजांचा इतिहास बाबासाहेब सांगत होते. त्यानंतर जाणता राजा या महानाट्याची मुहूर्तमेढ याच तळेगाव दाभाडे मध्ये रोवल्या गेली. मावळातील अल्हाददायक थंड वातावरण त्यांना फारच आवडायचं, त्यामुळे आठ-दहा दिवस तळेगाव मध्येच मुक्कामी राहत असे.

बाबासाहेबांच्या जाणता राजा नाटकात काम केलेल्या कलाकारांनी सांगितली सुंदर आठवण...
"...त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो" बाबासाहेब पुरंदरेंबद्दल राज ठाकरेंची एक आठवण

तळेगाव दाभाडे मधील अनेक नवोदित कलाकारांना घेऊन त्यांनी जाणता राजा हे महानाट्य तयार केले यातील एक कलाकार म्हणजे रमेश जाधव. बाबासाहेबांच्या दुःखद निधनाने जाधव यांना फार दुःख झाले झाले. जाणता राजा या महानाट्यामध्ये जाधव यांनी आपले दोन्ही मुले अभिनय करायला बाबासाहेबांना सोपवले होते अशा अनेक आठवणींना रमेश जाधव यांनी साम टीव्ही बोलताना उजाळा दिला.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com