छत्रपतींच नाव घेण्याची भाजपची लायकी आहे का? शिवसेना नेत्यांचा सवाल (पहा Video)
छत्रपतींच नाव घेण्याची भाजपची लायकी आहे का? शिवसेना नेत्यांचा सवाल (पहा Video)SaamTV

छत्रपतींच नाव घेण्याची भाजपची लायकी आहे का? शिवसेना नेत्यांचा सवाल (पहा Video)

2 दिवसापूर्वी बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याच्या निषेधार्थ लागबागमध्ये आज शिवसैनिकांनी आंदोलन केलं.

मुंबई : दोन दिवसापूर्वी बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याच्या निषेधार्थ लागबागमध्ये आज शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवरती जोरदार निशाना साधला. (Arvind Sawant's strong criticism of BJP)

पहा व्हिडीओ -

ते म्हणाले, 'कर्नाटकात भाजप सरकार आहे तिथे छत्रपती शिवराय़ांचा अपमान होतो आणि तो करणाऱ्यावर कारवाई होत नाही. मात्र आम्ही आमचं सत्व आणि तत्व सोडलेलं नाही आम्हाला आमच्या मूळ स्वभावावरती यायला लावू नका असा इशाराच अरविंद सावंत यांनी कर्नाटक सरकारला आणि भाजपला दिला आहे.

महाराजांच्या अवमानाबाबत सगळ्यांची बोबडी वळली आहे का? या घटनेचा कोणताच भाजपचा (BJP) नेता निषेध करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसंच शिवरायांचं नाव पंतप्रधानांनी परवाच्या कार्यक्रमावेळी घेतलं, मात्र त्या शाई फेकणाऱ्यापेक्षा बसवराज बोम्मई यांच विधान गंभीर आहे. बोम्मई या घटनेला शुल्लक म्हणतात असा राज्य़कर्ता असेल तर यांना छत्रपती शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का?, छत्रपतींच नाव घेण्याची भाजपाची लायकी आहे का? असा घणाघातही त्यांनी भाजपवरती केला. तसच पंतप्रधानांनी बोम्मई यांचा राजीनामा घेवून भाजपनं दाखवावं की ते छत्रपतीसोबत आहेत.

छत्रपतींच नाव घेण्याची भाजपची लायकी आहे का? शिवसेना नेत्यांचा सवाल (पहा Video)
पंढरपुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळला

भाजपच्या एकाही माणसांनी त्या घटनेचा निषेध केलेला नाही यातूनच त्यांचा ढोंगीपणा उघड होत आहे असही ते म्हणाले. 'बोलतील एक, करतील एक' असे भाजपचे लोक राजकारणासाठी छत्रपतींचे नाव घेता की काय? असा सवालही त्यांनी भाजपवरती उपस्थित केला. मराठी एकीकरण समिती अध्यक्षांवर शाई फेकली तीच शाई महाराजांवर फेकली आता हे लोक दरवाजावर येतील काळजी घ्या असही सावंत यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.