Breaking: आर्यन खानला दिलासा नाहीच; जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी

अवघ्या देशाचं लक्ष लागून राहीलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनवाणी झाली.
Breaking: आर्यन खानला दिलासा नाहीच; 
जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी
Breaking: आर्यन खानला दिलासा नाहीच; जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणीSaam Tv

मुंबई: अवघ्या देशाचं लक्ष लागून राहीलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनवाणी झाली. यावेळी आर्यनच्या वतीने प्रसिध्द वकिल मुकुल रोहतगी आणि सतीश माने शिंदे युक्तिवाद केला.आजचा मुक्काम जेलमध्ये असणार असल्याचं उघड झाले आहे. ३ ऑक्टोबरपासून आर्यन खान एनसीबी कस्टडीमध्ये आहे. त्या दरम्यान आर्यन खान प्रकरणाला नवनवीन वळण मिळत गेलं. आर्यन खान प्रकरण कसं समीर वानखेंडेंकडे झुकलं हे कळालं देखील नाही. आर्यन खान सह त्याच्या साथीदारांची देखील चौकशी सुरु आहे. एनसीबीने अनन्या पांडेला देखील चौकशीसाठी बोलावले होते. आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील चॅट देखील व्हायरल झाले होते.

Breaking: आर्यन खानला दिलासा नाहीच; 
जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी
आचार्य तुषार भोसलेंची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली

दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवर धक्कादायक आरोप केले होते. त्यांनी काही पुराव्यानिशी समीर वानखेडे आणि त्यांची कारवाई कशी खोटी आहे हे दाखवले होते. परंतु समीर वानखेडेंनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतरही अनेक आरोप पुराव्यानिशी मलिक करत आहेत. समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात जाऊन साक्ष दिली आणि आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. वानखेडे काल सकाळी दिल्लीला दाखल झाले आहेत.

आर्यन खान प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. पंत म्हणून नेमण्यात आलेल्या प्रभाकर साईल खळबळजनक आरोप केले आहेत. त्याचबरोबर या कारवाईतील मुख्य पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो म्हणजे किरण गोसावी फरार आहे. आज सकाळीही नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सर्वांसमोर मांडला होता. त्यानंतर पुन्हा या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. एनसीबीने नवी मुंबईमध्ये केलेल्या कारवाईबाबतही पंचांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com