तृतीयपंथी म्हणून बाळाला आशिर्वाद देण्यासाठी आले अन् मंत्रोच्चार करत आईच्या गळ्यातील मंगळसूत्र नेले

तृतीयपंथी असल्याचे भासवत मंत्रोच्चार करत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आलं आहे.
Buldhana Crime
Buldhana Crimeसुरज सावंत

बुलढाणा: तृतीयपंथी असल्याचे भासवत मंत्रोच्चार करत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आलं आहे. सदर टोळी आपण तृतीयपंथी असल्याचे भासवत नागरिकांची फसवणूक करत होती.

MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अलका प्रजापती यांनी तक्रार दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची भाची प्रसूतीसाठी गुजरातहून मुंबईत आली होती. काही तृतीयपंथी त्यांच्या घरी आले, घरात नवजात बालक असल्याचे सांगत आशिर्वादासाठी त्यांनी त्या कुटुंबाकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. यावर आपण ५०० रुपयांपेक्षा जास्त देऊ शकणार नाही असं सदर घरातील मंडळींनी सांगितलं.

Buldhana Crime
कल्याणमध्ये दोन लाखाच्या बनावट नोटा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, या आरोपींनी घरातील व्यक्तींना एक साधा पांढरा कागद, तांदूळ आणि हळदी-कुंकू मागितलं आणि काही मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. शिवाय मंत्रोच्चार करत असताना एका आरोपीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे पेंडेंट मागितले. नंतर मंगळसुत्र आणि तो सोन्याचा ऐवज आणि तांदूळ एका पांढऱ्या कागदात गुंडाळून त्यांच्याजवळ दिले व पुडी सात दिवस घरातील देव्हाऱ्यात ठेवण्यास सांगितली.

शिवाय पुडी उघडू नका नाहीतर मुल आजारी पडेल असही त्यांनी यावेळी फिर्यादीला सांगितलं. दरम्यान, या आरोपींना सांगितल्याप्रमाणे ७ दिवसांनी महिलेने पुडी उघडली तेव्हा तेथे फक्त तांदूळ होते आणि ५१ हजार रुपयांचे मौल्यवान पेंडंट गायब होते. ही बाब लक्षात येताच महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार करून त्या परिसरातून सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ -

पुढे तपासात आरोपी बुलढाणा (Buldhana) येथील असल्याची माहिती मिळाली. या तिघांना बुलढाण्यातील सोनाळा गावातून एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. भानुदास सावंत , महेंद्र नागनाथ आणि प्रकाश शिंदे अशी आरोपींची नावे असून ते बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त महेश्वर रेड्डी यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com