सराईत चोरट्याकडे सापडले तब्बल १६ मोबाईल; लोकलच्या गर्दीचा फायदा घेत करायचा चोरी

लोकलमध्ये चढताना व उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल लंपास करायचा
Kalyan Crime News
Kalyan Crime Newsप्रदीप भणगे

कल्याण : लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या सराईत चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी स्टेशन (Kalyan railway police station) परिसरातून अटक केली आहे या चोराकडून १ लाख ८० हजाराचे १६ महागडे मोबाईल (Mobile) हस्तगत करण्यात आले आहेत.

अनिलकुमार वर्मा असे या आरोपीचे नाव असून हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. मुंबई लोकलच्या (Mumbai Local) गर्दीचा फायदा घेऊन  मोबाईल लंपास करणाऱ्या एका सराईत चोराला कल्याण लोहमार्ग  पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. या चोराकडून एक दोन नव्हे तर तब्बल १६ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

पाहा व्हिडीओ -

अनिलकुमार वर्मा असे या आरोपीचे नाव असून हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोपी लोकलमध्ये चढताना व उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल लंपास करायचा.

दरम्यान, अशाच एका मोबाईल चोरीचा गुन्ह्याचा तपास करत असताना कल्याण स्टेशन परिसरात संशयीत मिळून आला असता त्याला विचारणा केली. त्यावेळी सदर आरोपीने एक लाख ८० हजाराचे १६ महागडे मोबाईल चोरी केल्याची कबुली देली. तसंच सर्व मोबाईल पोलिसांना दिले. सध्या पोलीस हे मोबाईल कोणाचे आहेत त्या मालकांचा शोध करत आहे.तर चोरट्यावर आणखी किती गुन्हे आहेत, याचा तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com