हिंदुत्वावरून तुम्ही फाटके आहात का? आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

शिवाजी पार्कवर ईद नमाज पडू द्या; असे म्हणणाऱ्यावर कारवाई का नाही. संजय राऊत झेंड्याचा कलर बदलायला निघाले का?
हिंदुत्वावरून तुम्ही फाटके आहात का? आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल
Ashish Shelar Saam TV

सुशांत सावंत -

मुंबई : मला शिवसेनेला (Shivsena) प्रश्न विचारायचे आहे मनोहर जोशी, ढाके ढाचा तुटला तेव्हा कुठे होते. मिस्टर राऊत तुमचे तोंड काळे होईल, ज्यावेळी विटांचे पूजन केले तेव्हा राऊत तुम्ही कुठे होता. जेव्हा गंगा पूजन होते तेव्हा तुम्ही कुठे गोधड्या ओल्या करत होता असे सवाल करत भाजपनेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, काँग्रेस (Congress) सरकारचे कमिशन होते, तेव्हा शिवसेना राममंदिर या विषयात अदखलपत्र आहे. कल्याणसिंह यांच्याकडे ट्युशन लावा बेडूक उड्या मारणारी शिवसेना आहे. शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा असा आहे. हिंदुत्वावरून तुम्ही फाटके आहात का? शिवसेना हे फाटकं बनियान आहे असे तुम्हाला आम्ही म्हणायचे का? ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतात त्या जाणत्या राजाला विचारा अशी घणाघाती टीका भाजपनेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली.

मुख्यमंत्री यांच्यासोबत राज्यातील मंत्र्यांनी योगी ट्युशन क्लासेस लावावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) ईद नमाज पडू द्या; असे म्हणणाऱ्यावर कारवाई का नाही. संजय राऊत झेंड्याचा कलर बदलायला निघाले का? मनसे कार्यकर्त्यांना नोटीस दिल्याप्रकरणावर बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे, असं मला वाटतं. आमच्या दोन पदाधिकाऱ्यांना का नोटीस दिली. कायद्याचे राज्य आहे का? तुमच्या घरात बसून कायदे होत नाहीत असही शेलार म्हणाले.

 Ashish Shelar
Raj Thackeray Warrant: राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट, काय आहे प्रकरण?

मोदींच्या विरोधात राज ठाकरे (Raj Thackeray) सुपारी घेऊन बोलत होते हे अजित दादांनी मान्य केले. मग त्यांनी आता सुपारीची किंमत सांगावी राज्य सरकार शरद पवार यांच्या इशारावर चालते तसंच यांच्या विरोधात कुणी बोलला की त्यांना नोटिसा पाठवतात तानाशाही, दमनशाही आणि आणीबाणी सुरू आहे. वैचारिक स्वातंत्र्य संपले आहे. आताच नोटीस का येते ती बिल्डींग का येते. आता काँग्रेसला कुणी विचारत नाही त्यांना काहीच माहीती नसते असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.