Assam Flood Relief fund : शिंदेंनी ५१ लाखांचा निधी दिल्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मराठीत ट्विट

Assam CM Himanta Biswa Sarma Giving Thanks To Eknath Shinde : आसाममध्ये पूराचे संकट मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आतापर्यंत १०० हून लोकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे.
Assam CM Himanta Biswa Sarma Giving Thanks To Eknath Shinde And ShivSena Rebel MLA
Assam CM Himanta Biswa Sarma Giving Thanks To Eknath Shinde And ShivSena Rebel MLASaam Tv

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) आमदार बंड करुन गुवाहाटीमध्ये गेले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. बंडखोर आमदार सध्या असलेल्या आसाम (Assam) राज्यात पूराचे (Flood) संकट सुरू आहे. आतापर्यंत आसाममध्ये पुरामुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून बंडखोरी केलेल्या गटाकडून ५१ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. यानंतर बंडखोर आमदारांनी आसामच्या पूराला दिलेल्या मदतीमुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचे मराठीत आभार मानले आहेत. (Assam CM Himanta Biswa Sarma Giving Thanks To Eknath Shinde)

हे देखील पाहा -

"आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय" असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Eknath Shinde Latest News)

यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा यांनी "मा. श्री. शिंदे साहेब व शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारानचे धन्यवाद आपण आसामच्या महापुरा साठी ५१ लाखाची मुख्यमंत्री मदत निधी केली आपले खुप आभारी आहोत." असं ट्विट मराठी भाषेत करत एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत. (Assam CM Himanta Biswa Sarma Tweet)

Assam CM Himanta Biswa Sarma Giving Thanks To Eknath Shinde And ShivSena Rebel MLA
राऊतांनी सगळं सोडलं, पण ते पवारांना सोडायला तयार नाही; गुलाबराव पाटलांची बोचरी टीका

गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटीमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. तर दुसरीकडे आसाममध्ये पूराचे संकट मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आतापर्यंत १०० हून लोकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. ५ हजारहून अधिक गावांमध्ये ४७,७२,१४० लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील विविध भागात २ लाखांहून अधिक लोक मदत छावण्यांमध्ये आहेत. आसाममधील या पूर संकटाला शिवसेनेतील बंडखोर आमदारांनीही मदत केली आहे. गेल्या काही दिवसापासून या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाखांची मदत करण्याचे जाहीर करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com