यवत यादववाडी येथे बिबट्याच्या जोडीने २ शेळ्या केल्या फस्त

दौंड तालुक्यातील जनार्दन यादव यांच्या घरासमोरील गोठ्यातल्या शेळ्यांवर पहाटेच्या सुमारास एक बिबट्या मादी व तिच्या पिल्लाने हल्ला करत दोन शेळ्या मारून टाकल्या.
यवत यादववाडी येथे बिबट्याच्या जोडीने २ शेळ्या केल्या फस्त
यवत यादववाडी येथे बिबट्याच्या जोडीने २ शेळ्या केल्या फस्तSaam TV News

पुणे - जिल्ह्यातील pune दौंड daund तालुक्यातील यवत यादववाडी येथील जनार्दन राजाराम यादव यांच्या घरासमोरील गोठ्यात असणाऱ्या शेळ्यांवर आज पहाटेच्या सुमारास एक बिबट्या leopard मादी व तिच्या पिल्लाने हल्ला करत दोन शेळ्या मारून टाकल्या. मृत एक शेळीचा गळ्यातील दोर न तुटल्याने ती जागीच फेकून दुसरी शेळी शेतात ओढत नेली, तर एक शेळी जखमी केली. यवत स्टेशन परिसरातील ही तिसरी घटना असून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही बाब आहे. अनेक शेतकऱ्यांचे उघढ्यावर गोठे आहेत, त्यामुळे रात्र जागून काढण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे,भटके कुत्रे देखील गायब असल्याने या कुत्र्यांची शिकार सुद्धा या बिबटयाच्या जोडीने केल्याची चर्चा परिसरात आहे. At Yavat Yadavwadi, a pair of leopards killed two goats

हे देखील पहा -

यवत गावचे सरपंच समीर दोरगे व उपसरपंच सुभाष यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. यवत परिसरातील बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भविष्यात मोठी जीवितहानीसाठी होण्याअगोदरच वनविभागाने तात्काळ पिंजरे लावून बिबट्याच्या जोडीला कैद करावे अशी सरपंच समीर दोरगे यांनी मागणी केली. वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयास तात्काळ उपाययोजना करणेबाबत ग्रामपंचायत कडून पत्रव्यवहार करणार असल्याचे उपसरपंच सुभाष यादव यांनी सांगितले. ऊस तोडल्यावर हेच बिबटे गावात येऊन धुमाकूळ घालत आहेत. मात्र केवळ जंगली आणि डोंगरी भागांत असलेले बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहेत. या बिबट्यांपासून सुरक्षेसाठी आता नव्या उपाययोजना वनविभागाला कराव्या लागणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com