Thane News: ठाण्यात एटीएम मशीन फोडले, आरोपी सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thane ATM CCTV Footage: सीसीटव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
Thane ATM News
Thane ATM NewsSaam Tv

Thane Police: ठाण्यामध्ये एटीएम मशीन (ATM Machine) फोडल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Thane Police) आरोपीला अटक केली आहे. एटीएम फोडण्याची ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली होती. या सीसीटव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Thane ATM News
LIC ची 'ही' पॉलिसी आहे सर्वात लोकप्रिय, मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त परताना

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास घडली होती. वागळे इस्टेट परिसरातील जीएसटी भवन रोड नंबर 22 वर हे एटीएम आहे. हे एटीएम फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला होता. एटीएम फोडण्याची माहिती मिळाल्यानंतर ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता.

घटनास्थळी तपास करत असताना पोलिसांना एटीएममधील सीसीटव्हीत एटीएम मशीन फोडण्याची घटना कैद झाल्याचे निदर्शनास आले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी ठाण्याच्या नेहरुनगर परिसरात राहणाऱ्या आरोपीला अटक केली. प्रकाश शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता 457, 380, 511 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता.

Thane ATM News
BSF Soldier Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनाचा भीषण अपघात, १ जवान शहीद, ६ जखमी

दरम्यान, जळगावातील रिंग रोडवरील बडोदा बँकेचे एटीएम 15 मार्चला फोडल्याची घटना घडली होती. एटीएमच्या कॅबिनमध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास चोरटा शिरल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चोरट्याने एटीएम मशीनच्या मागील बाजूची पाहणी केली. नंतर मशिनच्या कॅशबॉक्सचा पत्रा उघडून आतील एटीएम हाताने तोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन फोडण्यात अयशस्वी झाल्याने चोरटा पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com