अंबरनाथच्या आयुध निर्माणीने बनवली एटीआर गन!

इजिप्तने दिलेल्या ऑर्डरनुसार चार महिन्यात निर्मिती
अंबरनाथच्या आयुध निर्माणीने बनवली एटीआर गन!
अंबरनाथच्या आयुध निर्माणीने बनवली एटीआर गन!अजय दुधाणे

अंबरनाथ - संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या आयुध निर्माणीने दोन एटीआर गनची निर्मिती केली आहे. इजिप्तने दिलेल्या ऑर्डरनुसार या गन तयार करण्यात आल्या आहेत. अंबरनाथच्या आयुध निर्माणीतील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीने या गन तयार केल्या आहेत. इजिप्तमध्ये सैनिकी प्रशिक्षणासाठी या गन्सचा वापर होणार आहे. या गन १४.५ एमएम एटीआर गन म्हणून ओळखल्या जातात. तब्बल १३०० मीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या गन्सची क्षमता आहे.

हे देखील पहा -

शिवाय खडकाळ परिसर, चिखल, बर्फ अशा कोणत्याही वातावरणात आणि प्रदेशात या गन वापरल्या जाऊ शकतात. अवघ्या ४ महिन्यात या दोन बंदुकांची निर्मिती अंबरनाथच्या आयुध निर्माणीत करण्यात आल्याची माहिती एमटीपीएफ कारखान्याचे जनरल मॅनेजर राजेश अग्रवाल यांनी दिली आहे.

अंबरनाथच्या आयुध निर्माणीने बनवली एटीआर गन!
"आम्हाला फासावर लटकवले तरी आंदोलनातून माघार घेणार नाही"

आयुध निर्माणी, म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरीजचं नुकतंच कॉर्पोरेटीकरण झालं असून एमटीपीएफ फॅक्टरी ही आता आर्मर्ड वेहिकल निगम लिमिटेड या कॉर्पोरेशनच्या अखत्यारीत आहे. आत्तापर्यंत फक्त भारतीय सैन्यासाठी लागणारं युद्धसाहित्य या फॅक्टरीत तयार केलं जात होतं. मात्र कॉर्पोरेटीकरण झाल्यानंतर परदेशी सैन्यासाठीही याठिकाणी साहित्य तयार केलं जाणार असून त्याची ही पहिलीच ऑर्डर आहे. त्यामुळे भविष्यात देशासह परदेशातही अंबरनाथमध्ये तयार केलेलं युद्धसाहित्य वापरलं जाणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com