आधीच बंद असलेला महाराष्ट्र, यांच्या कर्तृत्वाने पुन्हा बंद पाडण्याचा प्रयत्न - अतुल भातखळकर

भाजप रस्त्यावर उतरले नाही म्हणून त्यांना बंद कळला नसेल - नाना पटोले
आधीच बंद असलेला महाराष्ट्र, यांच्या कर्तृत्वाने पुन्हा बंद पाडण्याचा प्रयत्न - अतुल भातखळकर
आधीच बंद असलेला महाराष्ट्र, यांच्या कर्तृत्वाने पुन्हा बंद पाडण्याचा प्रयत्न - अतुल भातखळकरसुशांत सावंत

मुंबई : महाभकास आघाडीने आधीच बंद असलेला महाराष्ट्र यांच्या कर्तृत्वाने आज पुन्हा एकदा बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचे वक्तव्यं बाजपा आमदार अतुल भातखळकर MLA Atul Bhatkhalkar यांनी आज पत्रकारंशी बोलताना केलं आहे. सांगली, सातारा कोकणातील शेतकऱ्यांना मदत दिली नाही, यांच्याच घटकपक्षातील राजू शेट्टी Raju Shetty यांच्यावर टीका करत आहेत, आणि हे मात्र उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांसाठी UP Farmers मगरीचे अश्रू ढाळत आहेत अशी टीका देखील भातखळकर यांनी केली.(attempt to close Maharashtra, which was already closed -Atul Bhatkhalkar)

हे देखील पहा -

उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्या विरोधात राज्यातील जनतेला बेकायदा बंद करायला भाग पाडल्याबद्दल तसेच जे या बंद मुळे सामान्य नागरिकांचे जे काही नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई या तीन नेत्यांनी द्यावी यासाठी भाजपा येत्या तीन दिवसांमध्ये उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

बंदला जनतेने प्रतिसाद दिला - नाना पटोले

आधीच बंद असलेला महाराष्ट्र, यांच्या कर्तृत्वाने पुन्हा बंद पाडण्याचा प्रयत्न - अतुल भातखळकर
आज वसुली चालू आहे की बंद?; अमृता फडणवीसांच खोचक ट्विट

आज महाविकास आघाडी MVA च्या वतीने पुकारलेल्या बंद ला जनतेने प्रतिसाद दिला असून भाजप ने बंद ला विरोध केला असल्याचं वक्तव्यं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी केलं. भाजप शेतकऱ्यांच्या हत्येच समर्थन करत असेल तर त्यांचा आम्ही निषध करतो तसेच महाराष्ट्र भाजप नेते यांचा बंद ला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते. शिवाय भाजप रस्त्यावर उतरले नाही म्हणून त्यांना बंद कळला नसेल असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.