Video: रस्त्याच्या कामाचे पैसे न दिल्यानं मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
Mumbai Saam TV

Video: रस्त्याच्या कामाचे पैसे न दिल्यानं मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

राजू चन्नापा हुनगुंडे यांना साम टीव्हीशी बोलताना अश्रू अनावर झाले.

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) वसमत तालुक्यातील माळवटा गावातील राजू चन्नापा हुनगुंडे आणि त्यांच्या कुटुंबाने अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपण नांदेड जिल्हयातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचं काम केलं होते. ज्याची किमंत १ कोटी ७० लाख रुपये आहे. पैकी केवळ १४ लाख रुपये देण्यात आले आहेत.

बाकीचे पैसे मागितले म्हणून मला आणि माझ्या कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आली असा देखील आरोप केला हुनगुंडे यांनी केला आहे. याबाबत आपण बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची देखील भेट घेतली. परंतु तरीदेखील काम न झाल्याने आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला अस आंदोलकांच म्हणणं आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना हनगुंडे यांनी सांगितले की, आपण नांदेड जिल्ह्यातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचं काम केलं होते. काम पुर्ण झाले. कामाची किंमत जवळपास 1 कोटी 70 लाख रुपये आहे. त्यापैकी केवळ 14 लाख रुपये देण्यात आले असून, कामाचे उर्वरित पैसे मागितले असता माझ्या कुटुंबाला जबर मारहाण केली असल्याचा आरोप हनगुंडे यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत आपण काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचीदेखील भेट घेतली होती. परंतु तरीदेखील काम न झाले नाही, त्यामुळे अखेर आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असे राजू यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.