Kalyan News: शाहरुख खानचा घरात घुसून सिमरनचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सिमरनने धाडसाने त्याचा पाठलाग करत नागरिकांच्या मदतीने चोराला पकडले.
Crime
CrimeSaam tv

>> प्रदीप भणगे

कल्याण : कल्याणमध्ये शाहरुख खान नावाच्या चोराने सिमरन नावाच्या मुलीचा फोन चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा डाव फसला. सिमरनने धाडसाने त्याचा पाठलाग करत नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले. सध्या आरोपी शाहरुखला पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News)

ठाण्यातील कळवा परिसरात राहणारा 20 वर्षीय शाहरूख फिरोज खान हा सराईत चोरटा असून त्याच्यावर ठाणे परिसरात व इतर राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे हा चोरटा दिवसाढवळ्या इमारतीत किंवा चाळ परिसरात घराचे दरवाजे उघडे असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश करून घरातील मौल्यवान वस्तू लंपास करायचा. (Latest Marathi News)

Crime
Devendra Fadnavis : मनसे आमचा पार्टनर नाही, युतीचा सध्यातरी विचार नाही; फडणवीसांकडून मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पूर्णविराम

मात्र या शाहरुखचा डाव कल्याणमध्ये फसला. कल्याणमधील रामवाडी परिसरात 63 वर्षीय सेवानिवृत्त प्रेमनाथ मोदगीकर राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी दुपारी प्रेमनाथ यांच्या पाचव्या मजल्यावरील घराचा दरवाजा उघडा होता. यावेळी घरातील काही मंडळी बाहेर गेली होती. घरात प्रेमनाथ यांची मुलगी सिमरन एकटीच होती.

सिमरन किचनमध्ये असताना तिचा मोबाईल घराच्या दर्शनी भागातील हॉलमध्ये होता. कुणीही नसल्याचे पाहून शाहरूख खाने याने गुपचूप घरात प्रवेश केला. प्रेमनाथ यांच्या घरातील हॉलमध्ये ठेवलेला 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन तो पळू लागला. सिमरनला याची चाहूल लागताच तिने शाहरुखचा पाठलाग केला. तिने या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने सिमरनला जोरात धक्का देऊन खाली पाडले.

Crime
काँग्रेसमधूनही काही लोक येऊ शकतात; सामच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

या संधीचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला. मात्र सिमरनने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी शाहरुखला पकडले व त्याला कल्याण महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवदास ढोले, विजय भालेराव, पोलीस नाईक शेळके, शिरसाठ, जितू पाटील यांनी या चोराला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली. त्याची झडती घेतली असता याने याआधी पाच गुन्हे केल्याची कबुली देत त्या घरातून चोरलेला मुद्देमालही पोलिसांना दिला. सध्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com