पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिला जाणार शाही फेटा; जाणून घ्या त्याची वैशिष्टय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर
Pune News
Pune NewsSaam Tv

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे (Pune) महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण तसेच पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या टप्प्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. सत्ताधारी भाजपकडून पुण्यात मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पुण्यातील गिरीश मुरुडकर झेंडेवाले यांनी आकर्षक राजबिंडा शाही फेटा तयार केला आहे. हा फेटा तयार करण्यासाठी ऑस्ट्रेलियन डायमंडचा वापर करण्यात आता आहे.

फेट्यावर असणारे हिरे म्हणजेच आपली जनता आहे. या जनतेला घेऊन मोदी पुढे जाणार आहेत. या विचारातूनच आकर्षक राजबिंड्याची निर्मिती केली असल्याचे गिरीश मुरुडकर यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदींच्या कपड्यांच्या विचार करुन आम्ही क्रीम विथ रेड कापडाचा वापर केला आहे. तर फेट्याच्या वरच्या बाजूला गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिलं असल्याचं गिरीश मुरुडकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Pune News
पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्याशी चर्चा करावी; युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भारताला विनंती

या शाही फेट्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलात शिवमुद्रा बसविण्यात आली आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. यापार्श्वभूमीवर फेटा तयार करताना तो वजनाला हलका आणि डोक्याला जास्त गरम होणार नाही अशा पद्धतीने तयार करण्यता आला आहे. मोदींच्या स्वागतासाठी पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com