प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरती आकर्षक 'तिरंगी' सजावट

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या (Dnyaneshwar Maharaj) संजीवन समाधी मंदीराला फुलांच्या आकर्षक सजावटीत तिरंगा साकारत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरती आकर्षक 'तिरंगी' सजावट
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरती आकर्षक 'तिरंगी' सजावटरोहिदास गाडगे

आळंदी : आज देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आणि याच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या (Dnyaneshwar Maharaj) संजीवन समाधी मंदीराला फुलांच्या आकर्षक सजावटीत तिरंगा साकारत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिवस मर्यादित लोकांच्या उपस्थीत साजरा केला जाणार आहे अशात आळंदीत माऊलींच्या मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पहाटेचा पवमान दुग्धाभिषेक झाल्यानंतर महाआरती करण्यात आली यावेळी संजीवन समाधी मंदिरासह गाभा-यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली माऊलींच्या मंदिराला तिरंग्याची सजावट करत मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आल्याने माऊलींची आळंदी आगळीवेगळी पहायला मिळत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com