परप्रांतीयांच्या मुद्यावरुन अतुल भातखळकर मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करणार

मुख्यमंत्र्यांनी दोन समाजात तेढ निर्माण केला असून एका विशिष्ट समाजाला धाकात ठेवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय असा गंभीर आरोप भातखळकरांनी केला आहे.
परप्रांतीयांच्या मुद्यावरुन अतुल भातखळकर मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करणार
परप्रांतीयांच्या मुद्यावरुन अतुल भातखळकर मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करणारSaam Tv News

मुंबई: भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन समाजात तेढ निर्माण केला असून एका विशिष्ट समाजाला धाकात ठेवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय असा गंभीर आरोप भातखळकरांनी केला आहे. (Atul Bhatkhalkar will file a complaint against the Chief Minister on the issue of foreigners)

हे देखील पहा -

राज्यात गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल गृहविभागाची बैठक बोलवली होती. या बैठकीत चर्चा करत असताना दुसऱ्या राज्यातील लोकांवर म्हणजे परप्रांतीयांवर लक्ष ठेवावं लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच भुमिकेवर अतुल भातखळकरांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत मुंबईमधील समता नगर पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे देखील अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. भातखळकर म्हणाले, “परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचं वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात मी तक्रार दाखल करणार आहे. एका विशिष्ट समाजात द्वेष पसरवणं, भीती पसरवणं हा कायद्याने गुन्हा आहे.”

भातखळकर नक्की काय म्हणाले?

एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना भातखळकर मुख्यमंत्र्यावर टीका करत म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले वक्तव्य हे १०० टक्के बेशरमपणाचं, घटनेच्या विरोधी आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. एका रेपकेस संदर्भात चर्चा करत असतांना मुख्यमंत्री म्हणतात परप्रांतीयांवर आम्हाला नरज ठेवावी लागेल, असं म्हणतात. म्हणजे बलात्कार करणाऱ्याचा धर्म कोणता, जात कोणती, प्रांत कोणता हे बघून तूम्ही निर्णय घेणार आहात का? “स्वताला कायदा सुव्यवस्था सांभळता येत नाही. मुख्यमंत्री महोदय तुमच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी मंत्री बसले आहेत. त्यांच्याबाबत काय निर्णय घेणार आहात. ते राज्यातील आहेत की परराज्यातील आहेत. तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आरोप होत आहेत. महिलेने आरोप केले तर तिला तुरंगात टाकलं जात आहे. यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत. शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांवर अशाप्रकारचे आरोप आहेत. त्यांची नावे माझ्याकडे आहेत. मग ते काय आता परप्रांतीय आहेत का.” असा सवालही भातखळकरांनी उपस्थित केला आहे.

परप्रांतीयांच्या मुद्यावरुन अतुल भातखळकर मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करणार
Raj Thackeray यांनी परप्रांतीयांबाबत केलेली 'ती' मागणी मान्य

परप्रांतीयांची नोंद ठेवावी अशी भुमिका खरंतर राज ठाकरे यांनी याअगोदर मांडली होती, तसं आवाहनही राज ठाकरेंनी अनेकदा आपल्या भाषणांमधून केलं होतं. मात्र आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या या सूचनेबाबत गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. संजय राऊतांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र आता मनसेने याबाबात अद्यापतरी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com