'गरीब के हड्डी पे मोदी सरकार कबड्डी खेल रही है'- अतुल लोंढे

देशात सध्या महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढत आहे
Atul Londhe
Atul LondheSaam Tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: देशात सध्या महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. गरीब के हड्डी पे मोदी सरकार (Government) कबड्डी खेल रही है असे यावेळी अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले आहेत. गॅस सिलेंडर वर राज्य सरकार कुठलाही कर लावत नाही. देशभक्तीच्या नावाने सबसिडी सोडायला सांगितली आणि उज्वला गॅस योजना आणली. (Atul Londhe became aggressive against inflation)

हे देखील पाहा-

मात्र, आता गॅस ही मिळत नाही आणि त्या आधी दिल्या जाणारे रॉकेल देखील मिळत नाही. जीवन आवश्यक वस्तूच्या किंमती वाढल्या आहेत. मंदिर मस्जिद करून कुणाचं पोट भरणार नाही. सामान्य माणसाचे प्रश्न कोण सोडत नाही. राष्ट्रवादीने (NCP) पाठीत खंजीर खुपसला हे १००% खरं आहे.

Atul Londhe
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTC ने बदलले ऑनलाइन तिकीट बुकिंगचे नियम, जाणून घ्या

तर दुसरीकडे, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादीतर्फे भाजप (bjp) विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी हनुमानाची आरती करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला, तसेच महागाईविरोधात हनुमानाला साकडे देखील घातले आहे. आजच्या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्तेही जमले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com