MPSC Students
MPSC StudentsSaam TV

MPSC ची पुस्तकं लिहिणारा लेखक निघाला 'ऑफीस बॉय'; धक्कादायक वास्तव उघड

SAIM कट्टा पब्लिकेशन हाऊस आणि संबंधीत संपादकावरती कारवाई करण्याची मागणी विद्यार्थांनी केली आहे.

प्रविण ढमाले

पुणे: राज्यभरातून पुण्यामध्ये MPSC आणि UPSC करण्यासाठी विद्यार्थी येत असतात. रात्रीचा दिवस करुन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असतात. परंतु या विद्यार्थांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न याच पुण्यामध्ये झाला आहे. स्टुडंट अॅकॅडमिक इम्प्रूव्हमेंट मूव्हमेंट म्हणजेच SAIM कट्टा पब्लिकेश हाऊसने विद्यार्थांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न केलाय. संबंधीत पल्बिकेशन हाऊस स्पर्धापरीक्षांसाठी पुस्तकं प्रकाशीत करते. ज्या पुस्तकावर विश्वास ठेवून विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असतात ती पुस्तकं एखाद्या अधिकाऱ्यांने लिहिलेली असतील असे भासवले जाते. परंतु इथे पुस्तकावर नाव असलेली व्यक्ती कुठल्याही पदावर नसून ती ऑफिस बॉय, तसेच बनावट लेखक असल्याचं उघड झाले आहे.

SAIM कट्टा पब्लिकेशन हाऊस आणि संबंधीत संपादकावरती कारवाई करण्याची मागणी विद्यार्थांनी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की आमच्याकडे अशा नावाचे कोणतेही अधिकारी नाहीत. आयोगाचे कार्यक्षेत्र हे परीक्षा आयोजीत करण्यापुरते असल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.

MPSC Students
Breaking: पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्यांचा हाय होल्टेज ड्रामा; पाहा Video

MPSC च्या गट अ आणि ब अंतर्गत अनेक पदांसाठी स्पर्धात्मक परीक्षांसाठी पुस्तके छापणारी प्रकाशन संस्था आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी बनावट अधिकाऱ्यांच्या नावाने पुस्तके लिहिली जात असल्याचे उघड झाले आहे. पुस्तकांवरती डॉ. वैभव माळवे (डेप्युटी एसपी), NCERTच्या अंतीम सत्य पुस्तकावर डॉ. विवेक दोडे (उपजिल्हाधिकारी) आणि चालू घडामोडी अंतीम सत्य या पुस्तकावर डॉ. प्रज्ञादीप खोब्रागडे (सहायक राज्य कर आयुक्त ) यांची लेखक म्हणून नावं आहेत. आणि ही पुस्तकं SAIM कट्टा पब्लिकेशन हाऊसच्या नावाने प्रकाशीत करण्यात आली आहेत.

अनेक विद्यार्थांनी ही पुस्तकं विकत घेतली आहेत. काही विद्यार्थांच्या लक्षात आले की या पुस्तकामध्ये असंख्य चूका आहेत. लेखकांच्या पदांची सत्यता तपासण्यासाठी, एका विद्यार्थ्याने प्रथम SAIM कट्टाचे संपादक समाधान निमसरकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी पुरावे देण्यास नकार दिला.

लोकशासन पक्षाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब पाटोळे यांनी MPSCकडे आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल करून तीन कथित अधिकार्‍यांच्या नियुक्त्या आणि सध्याच्या पदनामांचा तपशील मागवला. त्याच्या उत्तरात, एमपीएससीने उघड केले की तुम्ही उल्लेखीत केलेल्या नावांचे व्यक्तींची कोणत्याही पदावर नियुक्ती झालेली नाही. त्याचे रेकॉर्ड अस्तित्वात नाही. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संताप असून प्रकाशन संस्था आणि बनावट अधिकारी आणि फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान विद्यार्थांनी दोषींवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारण ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थांनी ही पुस्तकं खरेदी करुन याचा अभ्यास केलेला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com