Auto Rickshaw Strike In Palghar : पालघर, बोईसरातील रिक्षा संपामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल

यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले.
Palghar, Auto Rickshaw Strike
Palghar, Auto Rickshaw Strikesaam tv

Palghar News : परिवहन विभागाने इलेक्ट्रिक मीटरच्या री कॅलिब्रेशन संदर्भात घेतलेल्या निर्णयाला मुदतवाढ मिळावी म्हणून आज पालघर जिल्ह्यात रिक्षा चालक-मालक संघटनांकडून एक दिवसीय संप (auto rickshaw strike in palghar) पुकारण्यात आला आहे. या संपला पालघर (palhgar) बोईसर शहरांत मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Palghar, Auto Rickshaw Strike
BMC News : मुंबईकरांनो ! चार फेब्रुवारीपर्यंत निम्म्या शहराला पाणी पुरवठा हाेणार नाही; जाणून घ्या भाग

परिवहन विभाग री कॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षांना प्रतिदिन पन्नास रुपये दंड ठोठावणार आहे. यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करत रिक्षा व्यावसायिकांनी, चालक - मालक संघटनांनी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील 36 हजार रिक्षा चालक सहभागी होणार असल्याचा दावा रिक्षा चालक-मालक संघटनांनी केला हाेता. (Maharashtra News)

Palghar, Auto Rickshaw Strike
Cyrus Mistry Car Accident : सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी चार्जशिट दाखल, 'मर्सिडीज' च्या अहवालात पंडाेल यांनी...,

या संपाला शहरी (city) भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागात मात्र रिक्षा सुरळीत सुरू असलेल्या पाहायला मिळत आहेत. पालघर, बोईसर शहरांमध्ये या संपला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे (students) मात्र हाल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला याच जिल्ह्यातील ग्रामीण भागात या संपचा काहीही परिणाम जाणवत नाही.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com