Baba Ramdev : "सलवार, साडी.. महिलांनी काही नाही घातलं तरी..." रामदेव बाबांची जीभ घसरली

बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थि होते.
Baba Ramdev
Baba RamdevSaam Tv

ठाणे : वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यात रान उठलेलं असताना आता यात आणखी एक भर पडली आहे. योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता मोठा उफाळण्याची शक्यता आहे. योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

ठाण्यातील योगा कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.  (Latest Marathi News)

Baba Ramdev
Amruta Fadnavis : मी राज्यपालांना जवळून ओळखते, त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम; अमृता फडणवीसांची काय म्हणाल्या?

बाबा रामदेव यांनी नेमकं काय म्हटलं?

योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते.या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या.

मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाब बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा.

Baba Ramdev
Maharashtra Politics ...मग नेहरूंनी केलेली चूक PM मोदी का सुधारत नाहीत? सामनातून भाजपला सवाल

महिला साड्या नेसून पण चांगल् दिसतात. महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा रामदेव यांनी म्हटलंय. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना रुपाली ठोंबरे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना काळं फासणार असल्याचा इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com