बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान- अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान- अमित देशमुख
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान- अमित देशमुख Saam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई : थोर इतिहासकार, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्री पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. श्री देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करण्यासाठी वाहिले.

हे देखील पहा-

छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी केलेला अभ्यास, संशोधन, संदर्भ हे आपणासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ' जाणता राजा ' या महानाट्याच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाचा वाटा दिला असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान- अमित देशमुख
रत्नागिरी भूकंपाने हादरला; कोणतीही हानी नाही!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर मागील आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपाचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती या ठिकाणी असलेल्या निवास स्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनाकरिता गर्दी होत आहे. पर्वती पायथा निवासस्थानी ८ ते १२ वाजेपर्यंत अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.