शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले अंत्यदर्शन

उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले अंत्यदर्शन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले अंत्यदर्शनSaam Tv

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर मागील आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपाचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती या ठिकाणी असलेल्या निवास स्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनाकरिता गर्दी होत आहे. पर्वती पायथा निवासस्थानी ८ ते १२ वाजेपर्यंत अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे देखील पहा-

इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी दुःख व्यक्त केले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्याकरिता त्यांनी अविरत प्रयत्न केले आहेत. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले अंत्यदर्शन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, जेष्ठ विचारवंत बाबासाहेबांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. या जगविख्यात इतिहासकार, कठोर परिश्रमाने आणि एखादया प्रमाणे, प्रत्येक घराघरामध्ये शिवचरित्र पोहाचवण्याकरिता अविरत प्रयत्न केले आहेत. सातारच्या छत्रपती घराण्याशी त्यांचा वेगळाच ऋणानुबंध होता. शिवशाहीर ही पदवी, आमच्या आजी कै.राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनी त्यांना सातारा या ठिकाणी सन्मानाने देण्यात आली होती. १९८५ च्या दरम्यान जाणता राजा हे महानाटय मंचकावर आणुन बाबासाहेबांनी अव्दितिय कार्य त्यांनी केले आहेत. त्याचे काळाच्या पडदयाआड जाणे, मनाला चटका लावणारे आहे. बोलायला शब्दच नाहीत, इतिहास अभ्यासक्षेत्राचे तर कधीही भरुन न येणारे नुकसान त्यांच्या निधनामुळे झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.