...तर भविष्यात प्रहारचाही मुख्यमंत्री होऊ शकतो : बच्चू कडू

'अपक्ष आणि छोट्या पक्षाचा प्रभाव येत्या काळातही दिसणार आहे. तर भविष्यात प्रहारचाही मुख्यमंत्री (Chief Minister) होऊ शकतो, असे विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे.
...तर भविष्यात प्रहारचाही मुख्यमंत्री होऊ शकतो : बच्चू कडू
Bacchu kadu Saam Tv

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. विधान परिषदेच्या १० व्या जागेसाठी खरी लढत होत आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे सहा उमेदवार तर भाजपचे पाच उमदेवार रिंगणात असून मोठा रणसंग्राम सुरू आहे. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'अपक्ष आणि छोट्या पक्षाचा प्रभाव येत्या काळातही दिसणार आहे. तर भविष्यात प्रहारचाही मुख्यमंत्री (Chief Minister) होऊ शकतो, असे विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे.

Bacchu kadu
मविआ सरकारच्या अहंकाराचा पराभव निवडणुकीत होईल; सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

विधान परिषदेच्या निवडणुकीत एक एक मत महत्वाचं असतं हे दिसून आलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही छोट्या आणि अपक्ष आमदारांच्या मताचे महत्व पुन्हा एकदा दिसून आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घटक पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी वाऱ्या घातल्या होत्या. बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी भाजपसहित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरार येथे गेले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे महत्व वाढल्याचा पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'येणाऱ्या काळात अपक्ष आणि लहान पक्षांचे महत्व वाढेल आणि तेच ठरवतील मुख्यमंत्री कुणाला बसवायचं, तसंच भविष्यात प्रहारचाही मुख्यमंत्री होऊ शकतो, असा विश्वास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

Bacchu kadu
राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पूर्ण

...अन्यथा आम्हाला कोण विचारत होतं : देवेंद्र भुयार

राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही खारीचा वाट उचलणाऱ्या अपक्ष आमदारांचे मतदानाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्यावर मतदानावरुन निशाणा साधला होता. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत खुद्द देवेंद्र भुयार यांनी त्यांची मतदानाची भूमिका स्पष्ट केली आहे.

विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाचा देवेंद्र भुयार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहायला मिळालं, हातभर गादीवर झोपायला मिळालं, अन्यथा आम्हाला कोण विचारत होतं,मतं देऊनही गैरसमज पसरवले गेले.मात्र आताही सांगत आहे, मत महाविकास आघाडीला दिलं आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा निवडणुकीत संशय व्यक्त केलेल्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com