Political News : एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली जातेय? असीम सरोदेंनी उपस्थित केला सवाल

Asim Sarode Tweet : मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या गदारोळांवर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांना आपलं मत मांडलं आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV

Political News :

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राजकारण तापलं आहे. यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

मराठा आंदोलकही सरकारवर सडकून टीका करताना दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde
Onion Farmers News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! अनुदानाचा पहिला हप्ता आज वितरित होणार

मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या गदारोळावर कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे यांना आपलं मत मांडलं आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवाल असीम सरोदे यांना उपस्थित केला आहे.

Eknath Shinde
Manoj Jarange Health: मनोज जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज; तपासणी अहवाल पाहून डॉक्टरही चिंताग्रस्त

असीम सरोदे यांचं ट्वीट

'एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी आणि मागण्यासाठी पार्श्वभूमी व कारणे तयार केली जात आहेत का? कारण आरक्षण हा विषय तर राज्य सरकार सोडवू शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकारनेच संविधानिक सुधारणा केली पाहिजे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय झालाय हे दुर्दैव', असं ट्वीट ॲड. असीम सरोदे यांनी केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com