Badlapur News: 'त्या' एका गोष्टीचा राग इतकी वर्षे मनात होता, ९ वर्षांनंतर केला माजी नगरसेवकावर हल्ला

पिस्टल दाखवत दिली हाेती जीवे मारण्याची धमकी दिली.
Crime , Badlapur
Crime , Badlapur Saam TV

Badlapur : बदलापुरातील (badlapur) माजी नगरसेवकावर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीस अटक (arrest) केली आहे. पूर्ववैमनस्यातून माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पाेलिसांकडून (police) देण्यात आली. दरम्यान या घटनेतील मुख्य संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून २ पथकं रवाना झाली आहेत. (badlapur latest marathi news)

या घटनेबाबत पाेलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी - बदलापूरमधील माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे हे मंगळवारी रात्री शिरगाव आपटेवाडी परिसरातून कारने त्यांच्या घरी जात होते. यावेळी महेंद्र उर्फ पप्पू बागुल, अरबी विशाल आचार्य या दोघांनी मोरे यांच्या गाडीला आडवी घातली. यानंतर पप्पू बागुल याने मोरे यांच्याजवळ जात त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी माेरे यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदवली हाेती. बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवत विशाल आचार्य याला त्याच्या गाडीसह ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली.

Crime , Badlapur
बदलापुरात माजी नगरसेवकावर हल्ला, आधी बंदूक दाखवत कार अडवली, नंतर मारहाण

सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव म्हणाले या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पप्पू बागुल याने २०१३ साली शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी म्हात्रे यांचे समर्थक असलेल्या आऊ मोरे यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. त्याच रागातून मोरे यांच्यावर ९ वर्षांनी हल्ला केला असे तपासात समाेर आले आहे.

पप्पू बागुल हा सराईत गुंड आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी आता पोलिसांनी २ पथकं रवाना केली आहेत असेही सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Crime , Badlapur
Nandurbar : नंदुरबारच्या सराफास लुटणाऱ्या सहा युवकांना बदलापूरात अटक
Crime , Badlapur
Bail Pola In Maval : बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आला नवा शासन निर्णय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com