चोरांचा हैदोस, एकाच इमारतीत तीन फ्लॅट फोडले

बदलापूरमध्ये एकाच इमारतीत रात्रीच्या सुमारास ३ घरफोड्या झाल्याची घटना समोर आली आहे
चोरांचा हैदोस, एकाच इमारतीत तीन फ्लॅट फोडले
चोरांचा हैदोस, एकाच इमारतीत तीन फ्लॅट फोडले अजय दुधाणे

बदलापूर : बदलापूरमध्ये Badlapur एकाच इमारतीत building रात्रीच्या सुमारास ३ घरफोड्या housebreaker झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरट्यांनी बंद असलेल्या, फ्लॅट लॅच तोडून, मुद्देमाल चोरुन नेला आहे. हा सर्व घरफोडीचा प्रकार सीसीटीव्ही CCTV कॅमेरा मध्ये चित्रित झाला आहे. बदलापूर बेलवली Belwali भागातील मारुती नंदन सोसायटी मध्ये ही घटना घडली आहे.

हे देखील पहा-

रात्री अडीच वाजेच्या सुमारास या सोसायटी मधील तिसरा मजल्यावर राहणारे, सचिन मनगुतकर हे गावाला गेले असताना, त्यांच्या घराचा लॅच तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. घरामधील सोने- चांदी तसेच टीव्ही घेऊन हे चोर लंपास झाले आहेत. त्याआधी या चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटही फोड़ला आहे. मात्र, त्यात कोणी राहत नसल्याने त्यांच्या हाती काही लागले नाही. तसेच या चोरट्यांनी सोसायटीच्या ऑफिस देखील तोडले आहे.

चोरांचा हैदोस, एकाच इमारतीत तीन फ्लॅट फोडले
बुलढाण्यात चोरांचा सुळसुळाट; एकाच रात्रीत तीन ATM फोडले !

परंतु, तिथेही त्यांना काही मिळाले नाही. तोंडाला रुमाल बांधलेले २ चोर CCTV कॅमेरा मध्ये दिसत आहे. त्यांच्या हातात हातोड़ी, कटई, शिग असे घरफोडिचे हत्यार होते. तसेच फ्लॅट फोडण्या अगोदर त्या मजल्यावरील सर्व फ्लॅटला बाहेरून कड्या लावून घेतानाही चोर सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत. मात्र, या घटनेने या परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण असून, आता या चोरट्यांना पकडण्याच मोठे आव्हान आता पोलिसांसमोर Police आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com