मोठ्या भावाच्या वाढदिवशीच लहान भावावर काळाचा घाला; किरकोळ वादामुळे जीव गमावला

मोठ्या भावाच्या वाढदिवशी झालेल्या किरकोळ वादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बदलापूरात घडली आहे.
Badlapur Crime News
Badlapur Crime News Saam TV

बदलापूर: मोठ्या भावाच्या वाढदिवशी झालेल्या किरकोळ वादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बदलापुरात (Badlapur) घडली आहे. या वादात एका तरुणाने केलेल्या मारहाणीत दुसऱ्या तरुणाला वर्मी फटका बसल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मोठ्या भावाच्या वाढदिवशीच लहान भावाचा मृत्यू झाल्याने बदलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या पोद्दार कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या शिवम मोरे या तरुणाचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस (Birthday) होता. रात्री वाढदिवसानिमित्त मित्रांसोबत पार्टी करून शिवम कात्रप परिसरात त्याच्या मित्राला सोडण्यासाठी जात होता. यावेळीच पुष्कर धुळे या त्याच्या मित्रासोबत त्याचा वाद झाला. या वादादरम्यान शिवमने त्याचा लहान भाऊ शुभमला तिथे बोलावून घेतलं.

Badlapur Crime News
Pune Crime: भावानेच केला भावाचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

यावेळी या तिघांमध्ये वाद झाला यावेळी झाले्या झटापटीत पुष्कर धुळे याने शुभम याच्या छातीत कोपर मारली. मात्र, हा फटका वर्मी बसल्यानं शुभम तिथेच खाली कोसळला. त्याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पुष्कर धुळे याला अटक केली असून न्यायालयानं त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस (Police) कोठडी सुनावली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com