अखेर 'राजपुत्रा'साठी खड्डे बुजवले! कल्याण-कर्जत महामार्ग गेला होता खड्ड्यात

अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं हे खड्डे बुजवण्यात आले असून नागरिकांनाही त्यामुळं दिलासा मिळाला आहे.
Badlapur News
Badlapur NewsSaam Tv

बदलापूर - कल्याण कर्जत राज्य महामार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर (Badlapur) शहरांदरम्यान असलेल्या चिखलोली परिसरात खड्डे पडले होते. अनेक दिवसांपासून हा महामार्ग खड्ड्यात गेल्यानं नागरिकांना त्रास होत होता. मात्र अखेर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं हे खड्डे बुजवण्यात आले असून नागरिकांनाही त्यामुळं दिलासा मिळाला आहे.

हे देखील पाहा -

कल्याण कर्जत राज्य महामार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर शहरांदरम्यान मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या खड्ड्यांकडे सर्वच शासकीय यंत्रणांचं दुर्लक्ष होत असल्यानं रस्त्याला कुणीही वाली उरला नव्हता. मात्र राजपुत्राच्या आगमनानं अखेर नागरिकांना दिलासा मिळाला. कारण राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे शुक्रवारी अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरांच्या दौऱ्यावर आले होते.

Badlapur News
मुंबईत कारचा भीषण अपघात! कारचे झाले दोन तुकडे; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबईपासून अंबरनाथपर्यंतचा प्रवास त्यांनी लोकलने केला. मात्र पुढे बदलापूरला ते याच खड्डेमय रस्त्यावरून जाणार असल्यानं हे खड्डे तातडीनं बुजवण्यात आले. आता हे खड्डे रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीने भरले? एमएमआरडीएने भरले? बदलापूर पालिकेने भरले? की मनसेच्या कार्यकर्त्यांनीच भरले? हे मात्र समजू शकलेलं नाही. मात्र अमित ठाकरे यांच्या आगमनाने सर्वसामान्य वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com