रिक्षाचालकाला शिवीगाळ करणाऱ्या 'बजाज फायनान्स'च्या वसुली एजंटला अटक!

निखिल कांतीलाल अरणे, वय 23 वर्ष असे आरोपीचे नाव आहे.
रिक्षाचालकाला शिवीगाळ करणाऱ्या 'बजाज फायनान्स'च्या वसुली एजंटला अटक!
रिक्षाचालकाला शिवीगाळ करणाऱ्या 'बजाज फायनान्स'च्या वसुली एजंटला अटक!Saam TV

पुणे: बजाज फायनान्स (Bajaj Finance) च्या वसुली एजंटकडून रिक्षाचालकांना हप्ता वसुलीच्या कारणास्तव अत्यंत घाणेरड्या भाषेत धमकावल्याचा प्रकार पुणे शहरात उघडकीस आला होता. शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला पुण्यातील खडकी पोलीस स्टेशन अंतर्गत अटक करण्यात आली आहे. निखिल कांतीलाल अरणे, वय 23 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात राहणाऱ्या असिफ शेख या रिक्षा चालकाने या आरोपी विरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. असिफ शेख यांनी बजाज फायनान्स कडून 65 हजाराचे कर्ज घेतले होते, त्यापैकी 27 हजाराचे कर्ज त्यांनी फेडले आहे.

रिक्षाचालकाला शिवीगाळ करणाऱ्या 'बजाज फायनान्स'च्या वसुली एजंटला अटक!
'हिरकणी' शुभांगी पवार ठार; उदयनराजेंसह सातारा शाेकसागरात

कोरोनामुळे (Coronavirus) लागलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) रिक्षा व्यवसाय काही काळ बंद होते, त्यामुळे कर्ज फेडण्यास रिक्षा चालक असमर्थ होते. काही काळासाठी त्यांनी फायनान्स कंपनीकडे मुदत ही मागितली. मात्र कंपनीकडून सातत्याने हप्ता वसुलीसाठी फोन येता आहेत. वसुली एजंट आक्षेपार्ह संवाद साधत होते. या विरुद्ध रिक्षा चालकाने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. खडकी पोलीस स्टेशन अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.