उधार न दिल्याच्या रागातून केली बेकरीची तोडफोड; तोडफोडीची घटना CCTV मध्ये कैद

बेकरी मालकाने उधार देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या ग्राहकाने आपल्या साथीदारांसह केली बेकरीची तोडफोड.
उधार न दिल्याच्या रागातून केली बेकरीची तोडफोड; तोडफोडीची घटना CCTV मध्ये कैद
उधार न दिल्याच्या रागातून केली बेकरीची तोडफोड; तोडफोडीची घटना CCTV मध्ये कैदगोपाल मोटघरे

पिंपरी - चिंचवड : बेकरी मालकाने उधार देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या ग्राहकाने आपल्या इतर साथीदारांसह बेकरीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. पिंपरी - चिंचवड (Pimpri - Chinchwad) येथील काळेवाडी परिसरात असलेल्या न्यू रॉयल बेकरी (New Royal Bakery) नावाच्या दुकानात ही तोडफोडीची घटना घडली आहे. (Bakery vandalism due to non-lending anger)

हे देखील पहा -

10 नोव्हेंबरच्या रात्री 3 ते 4 जण ग्राहक म्हणून न्यू रॉयल बेकरी मध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ घेण्यासाठी आले होते, मात्र या सर्व वस्तू आपणाला उधार पाहीजे असं त्यांनी बेकरी मालकाला सांगितलं. मात्र या वस्तू उधार देण्यास मालकांने नकार दिल्यावर या चार जणांनी वस्तू उधार देण्याच्या तगादा लावला, तरिही बेकरी मालकाने ते सामान उधार देणार नाही असे ठामपणे सांगितले, या गोष्टीचा राग मनात धरून दुकानात ग्राहक म्हणून दाखल झालेले 3 ते 4 जणांनी बेकरी मालक व बेकरी वर ज़ोरदार दगडफेक केली.

उधार न दिल्याच्या रागातून केली बेकरीची तोडफोड; तोडफोडीची घटना CCTV मध्ये कैद
Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे... (पहा Video)

या घटने ची माहिती मिळताच वाक़ड पोलिस घटना स्थळी दाखल झाले. त्या नंतर या पूर्ण प्रकाराची हक़ीक़त बेकरीमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता त्या आधारा वर पोलिस पुढील तपास करित आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com