"भोंग्याच्या भूमिकेत तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना यश आलं नाही आताही येणार नाही"

'बाळासाहेब ठाकरे यांनी भोंग्या संदर्भात भूमिका घेतली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा भूमिका स्पष्ट केली होती तेव्हा बाळासाहेब यांना यश आले का?'
"भोंग्याच्या भूमिकेत तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना यश आलं नाही आताही येणार नाही"
Raj Thackeray/ Balasaheb ThackeraySaam TV

भूषण शिंदे -

मुंबई : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी भोंग्या संदर्भात भूमिका घेतली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा भूमिका स्पष्ट केली होती तेव्हा बाळासाहेब यांना यश आले का? तर नाही मग आता यश मिळेल का? तर नाही असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

महाराष्ट्र शासनाने OBC ला फसवणारे कारस्थान सुरु केल आहे. एक नवीन आयोग स्थापन केला आणि त्या नव्या आयोगाला इम्पेरिकल डेटा बनवायला सांगितलं आणि एकूण १८ मुद्द्यावर हा डेटा होता. पण त्या १८ मुद्द्यांवर या काही डेटा बनवला नाही. जो अहवाल १८ मुद्द्यावर पाहिजे होता. सरकारने फसवा अहवाल पुन्हा सुप्रीम कोर्टात दिला असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली आहे. तसंच हा चार पायाचा राजकीय पक्ष ज्यात भाजप सुद्धा आहे. हे फसवणूक करत असल्याचंही ते म्हणाले.

औरंगाबाद (Aurangabad) हे सेन्सेटिव्ह ठिकाण आहे. मुस्कानला सत्कार करण्यासाठी तिथे परवानगी मागितली पण दिली नाही. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नये असं माझं म्हणन असल्याचंही आंबेडकर म्हणाले.

Raj Thackeray/ Balasaheb Thackeray
...तर माझं अपहरण होऊ शकतं; गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या महिलेचा Video व्हायरल

बाळासाहेब ठाकरे यांनी भोंग्या संदर्भात भूमिका घेतली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा भूमिका स्पष्ट केली तेव्हा बाळासाहेब यांना यश आले का? तर नाही मग आता यश मिळेल का? तर नाही. असही ते म्हणाले. तसंच शासन विकनेस दाखवतं. शासनाला विकनेस दाखवण्याची गरज नाही. मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री यांनी त्यांच्या कारकिर्दीत दंगली झाल्या किंवा नाही झाल्या याचा रेकॉर्ड केला जातो. याचा विचार करूनच काँग्रेसची जशी परिस्थिती झाली तशी सत्ताधारी यांची होऊ नये. असं मला वाटतं असंही आंबेडकर म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com