बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले
बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन
Sanjeevani Karandikar Passes Away Saam Tv

पुणे: थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख (Shiv Sena chief) दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात (Pune) वृद्धापकाळाने निधन (Passes Away) झाले आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या ते आत्या होते. तर चित्रपट (Movies) सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होते.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणाले की, संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला व त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजू आत्यावर विशेष लोभ होता व संजू आत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!"

हे देखील पाहा-

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून संजीवनीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. संजीवनीताईंच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या तसंच बाळासाहेबांच्या अनेक वैयक्तिक आठवणींना उजाळा मिळायचा. त्यांच्या निधनानं बाळासाहेबांच्या भावंडांतील अखेरचा दूवा निखळला आहे. ठाकरे व करंदीकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो. संजीवनीताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

संजीवनी करंदीकर (Sanjeevani Karandikar) यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे त्यांनी मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केले आहे. संजीवनी करंदीकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Sanjeevani Karandikar Passes Away
बीडच्या पट्टीवडगावात छेडछाडीला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत संजीवनी करंदीकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुण्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.