बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा; वाट पाहते तुमची सेना, ट्रेनमधील व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओत प्रवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गाण गात असल्याचे दिसत आहेत.
Balasaheb Thackeray
Balasaheb ThackeraySaam Tv

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा गट तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना. आता यावरुन आमचीच शिवसेना खरी असे दावे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमिवर सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गाण गात असल्याचे दिसत आहे.

जीव लाऊनी काहो सोडून गेला तुम्ही, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना असे बोल या गाण्यात आहेत. हे गाण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

शिंदे गट आणि भाजप एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार अजुनाही झालेला नाही, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Balasaheb Thackeray
अभिमानास्पद! शिराळा नगरपंचायतीने फडकवला १०० फूट लांबीचा भव्यदीव्य नेत्रदीपक तिरंगा

शिवसेनेतील या बंडामुळे सेनेत फूट पडल्याचे दिसत आहे. या ४० आमदारांसह आता १२ खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तर राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com