उल्हासनगरात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवणारा बॅनर; मुख्यमंत्र्यांचा फोटो गायब

शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक आणि माजी महापौर यांनी लावला बॅनर
उल्हासनगरात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवणारा बॅनर; मुख्यमंत्र्यांचा फोटो गायब
Thane BannerSaam Tv

उल्हासनगर- महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची खुर्ची धोक्यात आली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दर्शवणारा एक बॅनर उल्हासनगरमधील (Ulhasnagar) ओटी चौकात लावण्यात आला आहे. शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अरुण आशान तसेच माजी महापौर लिलाबाई आशान यांनी हा बॅनर लावलेला आहे. चौकात हे बॅनर लावले गेल्याने सगळ्यांच्या नजरा त्या बॅनरकडे जात आहेत. या पोस्टर्समधून उद्धव ठाकरेंचा फोटो दिसत नाही आहे. ठाणे, रायगडमधील कार्यकर्तेही शिंदे यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पाहा -

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंद यांच्यासह शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे २ आमदार हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यानुसार सध्या ४८ आमदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आहेत. तर आणखी आठ आमदार मुंबई सोडून गेले आहेत. यामध्ये शिवसेनेचे तीन तर अपक्ष पाच आमदार आहेत. अशा स्थितीत शिवसेनेचे दोन तृतीयांश संख्याबळ यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

Thane Banner
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पश्चाताप होईल : संजय राऊत

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलेल्या 12 आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यांकडे करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीला दिलेल्या आव्हानामुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com