बारामती: जेजुरीत साजरा होणारा मर्दानी दसरा आणि पालखी सोहळा रद्द

मोजक्या मानकरी व सेवेकरी वर्गाकडून होणार देवाचे धार्मिक विधी - ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
बारामती: जेजुरीत साजरा होणारा मर्दानी दसरा आणि पालखी सोहळा रद्द
बारामती: जेजुरीत साजरा होणारा मर्दानी दसरा आणि पालखी सोहळा रद्द मंगेश कचरे

मंगेश कचरे

बारामती: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर साजरा होणारा दसरा उत्सव हा मर्दानीदसरा म्हणून ओळखला जातो. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे दसरा उत्सव साजरा करण्यावर बंधने निर्माण झाली आहेत. याही वर्षी मंदिरे जरी दर्शनसाठी खुली झाली असली तरी जेजुरीत दसरा पालखी सोहळा रद्द करण्यात आला असून मोजक्या मानकरी,पुजारी सेवेकरी,सोहळ्याचे पदाधिकारी,यांच्या उपस्थित खंडोबा देवाचे धार्मिक विधी होणार असल्याचे जेजुरी ग्रामस्थांच्या बैठकीत निर्यय घेण्यात आला आहे.

हे देखील पहा-

महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात. यापैकी दसरा उत्सव व दरी डोंगरात रमणारा उत्सव व मर्दानी उत्सव म्हणून लोकप्रिय आहे. या उत्सवाचे नियोजन करण्यासाठी जेजुरीकर ग्रामस्थांची बैठक जेजुरी येथील ऐतिहासिक छत्रीमंदिरात आयोजित केली होती. जेजुरीचा मर्दानी दसरा हा मानाचा व जेजुरीकरांच्या अस्मितेचा दसरा आहे.

बारामती: जेजुरीत साजरा होणारा मर्दानी दसरा आणि पालखी सोहळा रद्द
कोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्रात तुटवडा- नितीन राऊत

या उत्सवासाठी पालखी सोहळयाला कोरोनाचे नियम पाळून शासनाची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न केले मात्र परवानगी मिळाली नाही त्यामुळे यावर्षी हा मर्दानी दसरा उत्सव आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे त्याचबरोबर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत देवाचे धार्मिक विधी होणार आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.