बावधन येथे ऑनलाईन मागणीवरून किराणा माल देणाऱ्या गोडावूनला आग

बावधन येथील उत्तमनगर या ठिकाणी पुराणिक सोसायटी जवळ ऑनलाईन मागणीवरून किराणा माल घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीच्या गोडावूनला आग
बावधन येथे ऑनलाईन मागणीवरून किराणा माल देणाऱ्या गोडावूनला आग
बावधन येथे ऑनलाईन मागणीवरून किराणा माल देणाऱ्या गोडावूनला आगअमोल कविटकर

पुणे : बावधन येथील उत्तमनगर या ठिकाणी पुराणिक सोसायटी जवळ ऑनलाईन मागणीवरून किराणा माल घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीच्या गोडावूनला रात्री ११ वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. आग भयंकर मोठ्या प्रमाणात होती. सुमारे अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते.

हे देखील पहा-

आग विझविण्याचा खूप प्रयत्न चालू होता. शॉप बंद झाल्यामुळे आत कोणी नाही. बाहेर सुरक्षा रक्षक असतात. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीबाबत कोथरूड अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख गजानन पाथरुडकर यांनी दिलेली माहिती की, पत्र्याचे शेड दुकानासारखे परिसर मोठा आहे. आतील १५ ते २० रिक्षा बाहेर काढल्या आहेत. आत अनेक गाड्या जळाल्या आहेत.

बावधन येथे ऑनलाईन मागणीवरून किराणा माल देणाऱ्या गोडावूनला आग
#Nifad | निफाड शहरातील बाजारपेठात भीषण आग, आगीत कित्येक दुकानं जळून खाक

कोथरूड, कात्रज, सिंहगड, पाषाण हिंजवडी या ठिकाणी असलेल्या अग्निशमन दलाची यंत्रणा घटनास्थळी पोचली होती. आग विझविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आगीत किराणा माल जळून खाक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्टोअर बंद झाल्याने आत कोणी नसावे. हा सुमारे एक- दीड एकरचा परिसर आहे. सुरवातीला एका कोपऱ्यात आग लागली होती. यानंतर ती मोठ्या प्रमाणात भडकली. परिसरात मोठा जाळ दिसत होता. पार्सल घरी पोचविण्याचे वाहने आत मध्ये असतात.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com