दारुसाठी पैशाची मागणी करत आईला मारहाण, भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न!

खेड तालुक्यातील पापळवाडी गावातील घटना...
दारुसाठी पैशाची मागणी करत आईला मारहाण, भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न!
दारुसाठी पैशाची मागणी करत आईला मारहाण, भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न!Saam Tv

रोहिदास गाडगे

पुणे: पुण्याच्या ग्रामीण भागात Rural Area Pune कुटुंब कलहातून घडणाऱ्या घटना थांबायचं नाव घेत नाहीय दारूसाठी वृद्ध आईकडे पैशाची मागणी करत भावालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खेड Khed मध्ये घडली आहे. खेड तालुक्यातील पापळवाडी गावात शिंदे कुटुंब वास्तव्यात होतं वृद्ध आई दोन मुले आणि परिवार असा सुखी संसार सुरु असताना या शिंदे कुटुंबातील मुलगा सुनीलला दारुचं व्यसन लागलं अन संसाराची राख व्हायला सुरुवात झाली. मुलगा सुनीलने दारूसाठी वृद्ध आईकडेही पैशाची मागणी करत पैसे न दिल्याने आईलाच मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

हे देखील पहा-

मुलगा सुनीलने वृद्ध आईला मारहाण केल्याने भाऊ प्रविणने भावाला समजावण्यासाठी गेला असतानाच व्यसनाधीन झालेल्या सुनीलने भावाच्या छातीत भाला घुसवत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत भाऊ प्रविण गंभीर जखमी झाला आहे.

दारुसाठी पैशाची मागणी करत आईला मारहाण, भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न!
कल्याण: रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, 24 तासात आरोपी गजाआड!

तर, वृद्ध आईला मारहाण करुन भावाला गंभीर जखमी करणा-या सुनील शिंदेला राजगुरुनगर पोलीसांनी अटक केली आहे. सुनील आता न्यायालयीन कोठडीत आहे. 

ग्रामीण भागात दारुने अनेकांचे संसार उद्धवस्त केलेत त्यात कोरोनाच्या लॉकडाऊननंतर कुटुंबातील कलहाच्या घटना वाढत असताना रक्ताची नातीच रक्ताचा घोट घ्यायला निघाली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com