
भूषण शिंदे -
मुंबई : आज मी १०१ वेळा हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचून आलोय, हनुमान चालीसा मातोश्रीसमोर म्हंटली तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता विधानभवनात जातोय गुन्हा दाखल होतोय का ते पाहतो, ज्यांनी हनुमान चालीसाचा अपमान केला त्यांचा विनाश होणार असं वक्तव्य अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलं आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे. यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला.
हे देखील पाहा -
राणा म्हणाले, ' मी मतदानाला येताना १०१ वेळेस हनुमान चालीसा पठण करून आलो आहे. ज्यांनी हनुमान चालीसाचा अपमान केला त्यांचा विनाश होणार, उद्धवजींनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) सांगितलं काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करायला पाहिजे, तुम्ही एकदा मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केली तर मी काश्मीरला जाऊन वाचेन असंही राणा यावेळी म्हणाले.
तसंच भाजपाचे सगळे उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला. दरम्यान, आज दिवसभरात विधानभवन, मुंबई येथे राज्यसभेच्या (RajyaSabha) ६ जागांसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदान केलं असून सध्यांकाळी निकाल लागल्यानंतर कोणते उमेदवार विजयी होतील हे स्पष्ट होईल.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.