जमिनीचा लाभार्थी शेतकरीच बदलला; पुणे-नाशिक बायपास महामार्गाचा वाद

पुणे-नाशिक (Pune- Nashik National Highway) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 चे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.
जमिनीचा लाभार्थी शेतकरीच बदलला; पुणे-नाशिक बायपास महामार्गाचा वाद
जमिनीचा लाभार्थी शेतकरीच बदलला; पुणे-नाशिक बायपास महामार्गाचा वादSaam TV

पुणे: पुणे- नाशिक महामार्गाच्या बायपास जमिन भुसंपादनावरुन शेतकरी वर्ग आक्रमक असताना मोजणी आधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे चक्क लाभार्थी असलेला शेतकरी बदलला गेल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे समोर आला आहे.

पुणे-नाशिक (Pune- Nashik National Highway) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 चे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब गावच्या गट क्रमांक 328 या मिळकतीमध्ये एकूण 21 पोटहिस्से आहेत. म्हणजे 21 खातेधारक आहेत. 328 पैकी एकूण 13,900 चौरस मीटर क्षेत्र राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आले आहे. या गटक्रमांकातील 328/10 व 328/14 च्या खातेधारकांना सरकारकडून सुमारे 70 लाख रुपये मोबदला मिळाला आहे. मात्र प्रत्येक्षात जमिनीच्या पोटहिस्साची फाळणीच झाली नसल्याने मुळ बाधित शेतक-यांना लाभ मिळाला नसल्याचा प्रकार शेतकरीच सांगतात.

जमिनीचा लाभार्थी शेतकरीच बदलला; पुणे-नाशिक बायपास महामार्गाचा वाद
इथे सर्वजण 100 वर्ष जगतात म्हणे; जाणून घ्या त्यामागचं सिक्रेट

प्रत्यक्षात, जमिन संपादनात मालकी नसताही रंगनाथ पांडुरंग कानडे यांना 36,34,270 रुपये तर शंकर पांडुरंग कानडे 31,38,694 रुपये सन 2018 मध्येच पोहोचले आहेत, या गटावर वहिवाटीनुसार 21 जणांचा आधिकार आहे. या गटाच्या मोजणीनुसार वर्गवारी करुन शासकीय पातळीवरील अहवालानुसार निकाल मान्य करण्याचे कानडे यांनी मान्य केलं आहे.

पुणे- नाशिक महामार्गाच्या भूसंपादनाचे कामकाज सुरु असताना मोजणी आधिका-यांच्या गलथान कारभारामुळे ज्या शेतक-यांच्या जमीनीचे भूसंपादन झाले. त्यांना एका कवडीचाही मोबदला मिळालेला नाही. उलट ज्यांची एक इंचही जमीन गेली नाही त्यांना लाखो रुपयांचा मलिदा पोहोचलाय त्यामुळे कुटुंबाकुटुंबात वादाची ठिंनगी पडलीय असं असताना या संपुर्ण गटाची फेरमोजणी करुन योग्य मोबदला द्यावा अशी मागणी दोन्ही बाजुने केली जाते आहे.

दरम्यानच्या काळात तक्रारीनंतर भुसंपादन उपजिल्हाधिकारी क्र.13, कार्यालयाकडुन फेरमोजणीचे निर्देश देण्यात आले असुन आंबेगाव भुमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीसाठी आधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र पुर्वीच्या झालेल्या चुका सुधारायच्या कशा याच विवंचणेत आधिकारी गुंतले आहेत.

एकीकडे राज्यात आजही शेकडो हजार प्रकल्प असे आहेत, ज्यांमधील हजारो, लाखो प्रकल्प बाधितांना अनेक वर्षाच्या संघर्षानंतरही योग्य मोबदला मिळालेला नाही, त्यांचे पुर्नवसन झालेले नाही. दुसरीकडे मात्र काही अधिका-यांच्या गलथान कारभारामुळे गावकी भावकीत वादाची ठिंनगी पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com