तिकीट दरात वाढ न करता मुंबईकरांना बेस्टचं बेस्ट गिफ्ट...

आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाने यंदा तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे.
तिकीट दरात वाढ न करता मुंबईकरांना बेस्टचं बेस्ट गिफ्ट...
तिकीट दरात वाढ न करता मुंबईकरांना बेस्टचं बेस्ट गिफ्ट...सुमित सावंत

मुंबई: आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट बस उपक्रमाने यंदा तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे. तोट्यात धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाचा सन २०२२ - २३ चा तब्बल २,२३६.४८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना सादर केला. (Best gifted to Mumbaikars without increasing ticket pric)

हे देखील पहा -

बेस्ट उपक्रमाचा २,२३६.४८ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर झाला आहे, तर भांडवली खर्चासाठी ६९५.१८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात, बेस्ट परिवहन विभागाची तूट तब्बल २,११० कोटी ४७ लाख रुपये तर वीज विभागाची तूट १२६ कोटी १ लाख रुपये एवढी दर्शविण्यात आली आहे. सन २०२१ -२२ चा अर्थसंकल्पही १,८१८ कोटी रुपये तुटीचा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुटीमध्ये ४१८.४८ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास येते. बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग हा गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांनी तोट्यातच आहे.

बेस्टच्या उपक्रमाचे यंदाचे उत्पन्न अंदाजित ४ हजार ९९७ कोटी ४ लाख रुपये तर खर्च अंदाजित ७ हजार २३३ कोटी ५२ लाख रुपये इतका दाखविण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षाही खर्च जास्त असल्यानेच बेस्ट उपक्रमाचा तोटा २ हजार २३६ कोटी ४८ लाख रुपये इतका दर्शविण्यात आलेला आहे. बेस्ट उपक्रम वीज ग्राहाकांना उत्तम सेवा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असतो. बेस्ट पर्यावरणस्नेही आणि डिजीटल प्रदान सेवा वाढविण्यावर भर देणार आहे. वीज विभागाच्या साडेदहा लाख वीज ग्राहकांपैकी ६५ टक्के वीजग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज देयकाचे प्रदान करतात. त्यामुळे बेस्ट वीज विभाग, ग्राहक यांच्या मौल्यवान वेळेची नुसतीच बचत होत नाही तर वाहतूक खर्चातही बचत होत आहे. यापुढे डिजीटल प्रदानाची सुविधा ८० टक्के पेक्षा जास्त पातळीवर नेण्याकरिता बेस्टने डिजीटल प्रदान करणाऱ्यांना बक्षिस योजना सुरु केलेली आहे.

तिकीट दरात वाढ न करता मुंबईकरांना बेस्टचं बेस्ट गिफ्ट...
आज मुंबईत सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांकरिता विशेष मोहिम

'एसएमएस' मार्फत वीज ग्राहकांना वीजदेयके

'एसएमएस' मार्फत वीज ग्राहकांना वीजदेयके पाठविणे सुरु केलेले आहे. आगामी काळात अन्य डिजीटल माध्यमे आणि वीज भरणा केंद्रे बँकांच्या शाखांमार्फत विस्तारित करणे मुख्य केंद्रस्थानी असेल, असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे. बेस्ट उपक्रमामार्फत पुढील आर्थिक वर्षात महिलांसाठी विशेष बसेस सेवा सुुरु करण्याबरोबरच आणीबाणीच्या परीस्थीतीत मदतीसाठी खास मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर कॉर्पोरेट नोकरदारांसाठीही विशेष बस सेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.