आमच्या घरात हनुमान चालीसा म्हणायला या पण...; राणा प्रकरणावर मुख्यमंत्री कडाडले

मागच्या काही दिवसांपासून हनुमान चालीसावरुन राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV

रश्मी पुराणिक

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून हनुमान चालीसावरुन राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची इच्छा व्य्क्त केली आणि या वादाला सुरुवात झाली. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खारच्या घराबाहेर आणि मातोश्रीबाहेर तळ ठोकला. या संपुर्ण प्रकरणावर विरोधी पक्षातून शिवसेना आणि राज्य सरकारवर चांगलीच टीका झाली. आता संपुर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्यावर आणि भाजपवर नाव न घेता टीका केली आहे.

बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. हनुमान चालीसा आमच्या घरात येऊन बोलायचं जरुर बोला पण पद्धत असते. आमच्या घरात साधू संत दिवाळी दसऱ्याला नाहीतर कायम येत असतात पण ते परवानगी घेऊन येत असतात. दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते पण आम्हाला शिकवलं आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Beed: दोन वर्षांनी भरली यात्रा...; रथ ओढताना 14 वर्षीय मुलाचा चिरडून मृत्यू

मुख्यमंत्री आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की सगळे ताळतंत्र सोडून बोलत असतील तर आपण पण बोलले पाहिजे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असे म्हणत आहेत. हिंदुत्व काय धोतर आहे का? घातलं आणि सोडलं. बाबरी पाडली तेव्हा बिळात लपले होते. राम मंदिराचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. मंदिर बांधताना तुम्ही लोकांकडे झोळ्या पसरवल्या. शिवसेना प्रमुख म्हणायचे देवळात घंटा बडवणारे नाहीतर दहशतवाद्यांना बडवणारे हिंदू हवेत. आम्ही गदाधारी हिंदू आहोत, घंटा बडवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्ही काढू नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मला लवकरात लवकर एक सभा घ्यायची आहे. सगळ्यांचा सोक्षोमोक्ष लावायचा आहे. तेरी कमीज मेरी कमीज से भगवी कैसे असं म्हणणाऱ्यांचा समाचार घ्यायचं आहे. मुंबई महापालिकेसारख्या शाळा बनवून दाखवा मग बोला. बिनकामाचे भोंगे वाजवत आहे त्यांना मी काडीची किंमत देत नाही. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com