Bhandup Crime News : बायकाेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून युवकाचा खून; दाेघे अटकेत

या मारहाणीत सूरजचा मृत्यू झाला.
Accused Arrested, Bhandup
Accused Arrested, BhandupSaam Tv

Bhandup Crime News : भांडुप येथील प्रताप नगर येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून एका युवकाचा (youth) खून करण्यात आला आहे. या प्रकरणी दाेघांना पाेलीसांनी (arrest) अटक केली असून एकाचा शाेध सुरु आहे. (Breaking Marathi News)

भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन उन्हवणे यांनी दिलेल्या माहितीनूसार सूरज किशोर पटाईत असे घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणी अविनाश तोरणे आणि अश्विन तोरणे या दाेन युवकांना अटक करण्यात आली आहे.

Accused Arrested, Bhandup
Udayanraje Bhosale : पैशाशिवाय त्यांना दुसरं काही सूचत नाही; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

अविनाशच्या पत्नीचे सूरजसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय अविनाशला होता. या रागातून अविनाश, अश्विन आणि रूपेश भिसे यांनी सूरजला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सूरजचा मृत्यू झाला. या प्रकरणी अविनाश आणि अश्विन यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे नितीन उन्हवणे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Accused Arrested, Bhandup
Love : अख्या साता-यात रंगलीय त्याच्या प्रेमाची चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com