Bharat Gogawale News : पान, सुपारी, तंबाखू... 'पुडी' च्या व्हिडिओ वरुन भरत गाेगावलेंचे स्पष्टीकरण

आमदार आदित्य ठाकरे यांनी दाेघांच्या कृतीवर आक्षेप घेतला होता.
Bharat Gogawale, Shambhuraj Desai
Bharat Gogawale, Shambhuraj DesaiSaam Tv

- सचिन कदम

Bharat Gogawale News : पान, सुपारी, तंबाखू, विडी, काडी, दारु, माडी याबराेबरच चहा मी घेत नाही. त्यामुळे तंबाखू खाण्याचा प्रश्न येत नाही. आमच्याबद्दल विराेधक बाेलताहेत त्यांना बाेलू द्या पण आमच्या सर्व सहका-यांना माहित आहे आम्ही व्यसन करीत नाही. त्यामुळे प्रश्नच नाही असे आमदार भरत गाेगावले (Bharat Gogawale Latest News) यांनी पुडीवरुन झालेल्या प्रकरावरुन स्पष्टीकरण दिले. (Maharashtra News)

Bharat Gogawale, Shambhuraj Desai
Karad News : जनाई मळाई मंदिर परिसरात 14 पिस्तुलांसह दहा जणांना अटक, नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

विधानसभेच्या अधिवेशनाचे वेळी मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यान आमदार भरत गोगावले यांनी मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन काहीतरी घेतल आणि ते खाल्लं. या त्यांच्या कृतीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच सभागृहातील दृष्य आणि त्याची एकच चर्चा हाेती ती म्हणजे पुडीची. शंभूराज देसाईंनी (shambhuraj desai) भरत गोगावलेंना दिलेल्या पुडीवर गाेगावलेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

Bharat Gogawale, Shambhuraj Desai
Parbhani News : परभणीतील 101 सरपंच, 34 माजी नगरसेवक, शेकडाे कार्यकर्त्यांच्या हाती धनुष्यबाण; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

आम्हांला कोणते हि व्यसन नाही. केवळ मुखशुद्धीसाठी शंभुराज यांच्याकडुन इलायची घेतल्याचे गोगावले यांनी सांगितले. विरोधक त्यांचे काम करत राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांनाच माहिती आहे आम्ही कोणतेच व्यसन करीत नाही. त्यामुळे तंबाखुचा प्रश्न येत नाही असेही गोगावले यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com