शहापूर भातसा धरण ओव्हर फ्लो; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणारे भातसा धरण आज भरून वाहू लागले आहे.
शहापूर भातसा धरण ओव्हर फ्लो; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
शहापूर भातसा धरण ओव्हर फ्लो; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटलीफय्याज शेख

शहापूर : शहापूर तालुक्यातील मुंबईला (Mumbai) सर्वाधिक पाणी पुरवठा करणारे भातसा धरण (Bhatsa Dam) आज भरून वाहू लागले आहे. यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तालुक्यातील सर्वच धरणे भरून वाहू लागली असताना गेल्या चार दिवसापासून सतत पडत असलेल्या संततधार तर कधी जोरदार पावसामुळे (Heavy Rain) आज धरणाची पाणी पातळी 141.01 इतकी पाणी पातळी वाढल्याने शासकीय नियमानुसार धरण ओव्हरफ्लो करण्यात आले तर धरण भरल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.(Bhatsa dam overflow)

हे देखील पहा-

पाण्याचा वेग व नदीची पूजा व नदीत पाणी कमी झाल्याच्या कारणांनी तीन वेळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र आज 3 वाजून 20 मिनिटांनी शासकीय नियमानुसार धरण ओव्हरफ्लो (Overflow) करण्यात आले आहे. पहिल्या व पाचव्या अशा दोन दरवाज्यातून 25 सेंटिमीटर ने दरवाजे वर उचलण्यात येवून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले.

शहापूर भातसा धरण ओव्हर फ्लो; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
बेळगाव मध्ये मराठी माणसाचा नव्हे, संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव - देवेंद्र फडणवीस

नदी लगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास आणखी दरवाजे उघडुन अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com