Maharashtra Vidhan Parishad Election 2022 : आमची तीन 'त्यांना' देणार : हितेंद्र ठाकूर

विधान परिषदेची निवडणुक चूरशीची हाेणार असल्याने याचा निकाल काय लागताे याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
Hitendra Thakur, Maharashtra Vidhan Parishad Election 2022
Hitendra Thakur, Maharashtra Vidhan Parishad Election 2022 Saam Tv

विरार (hitendra thakur latest marathi news) : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Parishad Election 2022) रिंगणात असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची झाली आहे. विधानपरिषदेच्या (mlc) निवडणुकीसाठी दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 203 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अद्याप मविआ आणि भाजपसह अन्य पक्षातील आमदारांचे मतदान करायचे राहिले आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहील. (Maharashtra Vidhan Parishad election 2022 News updates)

मविआ (mva) आणि भाजपसाठी (bjp) प्रतिष्ठेची बनलेल्या या निवणुकीत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भुमिका महत्वाची मानली जात आहे. ठाकूर यांच्या आघाडीकडे तीन मत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकूर यांची विविध पक्षातील मान्यवरांनी भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले हाेते.

Hitendra Thakur, Maharashtra Vidhan Parishad Election 2022
Maharashtra Vidhan Parishad Election 2022 : मनसेच्या भुमिकेनं सस्पेन्स वाढला

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी विरारहून पावणे १२ वाजता मुंबईस रवाना झाला. यावेळी माध्यमांशी ठाकूर यांनी संवाद साधला. ज्यांनी विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे त्यांना आमचे आमदार मतदान करतील असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले सर्वांनीच आमच्याशी येऊन चर्चा केली आहे. या चर्चेत ज्यांनी आम्हांला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे त्यांचा आम्ही विचार करणार आहाेत.

Hitendra Thakur, Maharashtra Vidhan Parishad Election 2022
Maharashtra Vidhan Parishad Election 2022 : आमदार रवी राणांचा शाेध सुरु

आपल्या आघाडीवर घाेडेबाजाराचा आराेप हाेत आहे या प्रश्नावर ठाकूर यांनी कोणी घोडेबाजार केला याची चौकशी करावी अशी मागणी केली. दरम्यान परदेशात गेलेले हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव आमदार क्षितिज ठाकूर हे देखील मुंबईत दाखल झाले आहेत. ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी जे आम्हांला भविष्यात सहकार्य करणार आहेत त्यांना मत देणार असे सांगत असल्याने नक्की त्यांच्या आघाडीची मतं काेणााल जाणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Hitendra Thakur, Maharashtra Vidhan Parishad Election 2022
Maharashtra Vidhan Parishad Election 2022 : रुग्णालयातून आमदार लक्ष्मण जगताप मुंबईस रवाना
Hitendra Thakur, Maharashtra Vidhan Parishad Election 2022
Ashadhi Wari: विठ्ठलभक्तांनाे! लाडू प्रसाद महागला; जाणून घ्या नवा दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com