Bhavna Gawli, Saeed Khan
Bhavna Gawli, Saeed Khan Saam Tv

मोठी बातमी! भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना दिलासा

सईद खान यांना १८० दिवसांची अजून मुदत मिळाली असून ते संबंधित विभागाकडे दाद मागू शकतात.

मुंबई: शिवसेनेच्या (ShivSena) खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सईद खान यांचे मरीन ड्राइव्ह येथील वैयक्तिक ऑफिस ईडीने जप्त केले होते, ते खाली करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. १८० दिवसात जप्त केलेली मालमत्ता खाली करावी लागते, मात्र दिल्ली हायकोर्टाने अजून १८० दिवसांची मुदत दिली आहे. सईद खान यांच्यावर इडीने (ED) अटकेची कारवाई केली होती, मात्र नुकताच त्यांना जामीन मिळाला आहे. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष समितीत झालेल्या फेरफरानंतर ईडीने ही कारवाई केली होती.

सईद खान यांना १८० दिवसांची अजून मुदत मिळाली असून ते संबंधित विभागाकडे दाद मागू शकतात. मागिल एक वर्षापासून ईडीची खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे.

Bhavna Gawli, Saeed Khan
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंचा वाहून गेलेला पूल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभारणार

शिवसेना (Shivsena) खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. गवळी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले होते. त्यापूर्वी देखील ईडीने भावना गवळी यांना ३ वेळा समन्स पाठवले होते.

Bhavna Gawli, Saeed Khan
भावना गवळी हाजिर हो! पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांचे निकटवर्ती सईद खान saeed khan यांना मनी लाँडरिंग Money laundering प्रकरणात अटक केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com