देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेत मुख्यमंत्री होण्याचा योग? ज्योतिषतज्ज्ञ काय म्हणाले वाचा

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी १७ आमदारांसह बंड केल्याची माहिती मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेत मुख्यमंत्री होण्याचा योग? ज्योतिषतज्ज्ञ काय म्हणाले वाचा
Devendra FadnvisSaam Tv

मुंबई: सध्या राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी १७ आमदारांसह बंड पुकारले आहे, त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची कुंभ रास आहे, तर एकनाथ शिंदे यांची धनु रास आहे, त्यामुळे त्यांची मैत्री जुळते. हे एकमेकांना लाभदायक ठरू शकतात, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यावर ज्योतिषतज्ज्ञांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची रास कुंभ आहे, तर एकनाथ शिंदे यांची रास धनु आहे, त्यामुळे यांची कुंडली जुळते. ते एकमेकांचे गुण जुळतात. यावेळी त्यांचे सर्व गृह जुळून आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. तर दुसरीकडे भाजपची (BJP) पत्रिका बघितली तर मिथुन लग्न आणि मीन रविची पत्रिका आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता ज्योतिषतज्ज्ञ सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केले आहेत.

Devendra Fadnvis
उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेत शनी महाराज?ज्योतिषतज्ज्ञ काय म्हणाले? वाचा!

शिवसेनेत बंड झाले आहे. त्यामुळे हे बंड भाजपच्या पथ्थ्यावर पडू शकते असं बोलल जात आहे. जपने (BJP) विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) १७ आमदारांसह नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

Devendra Fadnvis
Video : महाराष्ट्राची राजकीय कुंडली काय सांगते? नेत्यांच्या पत्रिकेत काय? पाहा ज्योतिषी काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेत शनी महाराज?

सध्या राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी १७ आमदारांसह बंड पुकारले आहे, त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. यावर आता ज्योतिषतज्ज्ञांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेत शनी महाराजाने प्रवेश केला असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे ठाकरे सरकारच्या भविष्यावर महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी जून हा महिना अंत्यत प्रतिकुल दाखवत आहे. उद्धव ठाकरे यांची रास सिंह आहे, या कन्या लग्नाच्या पत्रिकेत २६ जूनला येणारा मंगळ आठव्या स्थानावरुन प्रस्थान करणार असल्यामुळे त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत प्रतिकुल दाखवत आहे. गुरुचे बळ हे या राशिला पॉवर फुल नाही, शनी जरी वक्री झाला तरी त्या व्यक्तीचे बाकीचे गृह किती स्ट्रॉग असेल तर काही होत नाही. त्यांना आता मोठ्या सपोर्टची गरज आहे. राजकीयदृष्ट्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे गुण जुळत आहेत, त्यामुळे ते सत्तेत येऊ शकतात, असं राजकीय ज्योतिषतज्ज्ञ सिद्धेश मारटकर म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com