एकनाथ शिंदेंचे बंड पथ्यावर पडणार का? उपमुख्यमंत्री होण्याचा योग

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी १७ आमदारांसह बंड केल्याची माहिती मिळत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv

मुंबई: शिवसेनेत नाराजीनाट्य सुरू आहे. राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी १७ आमदारांसह बंड पुकारले आहे, त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. 'एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात असे योग त्यांच्या पत्रिकेत असल्याचे मत ज्योतिषतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची रास धनु आहे, तर देवेंद्र फडणवीस यांची कुंभ रास आहे, त्यामुळे त्यांची मैत्री जुळते. हे एकमेकांना लाभदायक ठरू शकतात, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मिळून सत्ता स्थापन करु शकतात. यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात असं मत ज्योतिषतज्ज्ञांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

Eknath Shinde
Amruta Fadnavis attacks Thackeray government : अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची रास धनु आहे. दुसरीकडे भाजप नेते (BJP) देवेंद्र फडणवीस यांची रास कुंभ आहे, त्यामुळे त्यांची कुंडली जुळते. या दोन्ही राशीतील एकमेकांचे गुण जुळतात. या दोघांचे सर्व गृह जुळून आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांच्या पत्रिकेत सध्या उपमुख्यमंत्री होण्याचे योग आहेत. भाजपची पत्रिका बघितली तर मिथुन लग्न आणि मीन रविची पत्रिका आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे, अशी शक्यता ज्योतिषतज्ज्ञ सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेत मुख्यमंत्री होण्याचा योग? ज्योतिषतज्ज्ञ काय म्हणाले वाचा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्याचे योग?

सध्या राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी १७ आमदारांसह बंड पुकारले आहे, त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची कुंभ रास आहे, तर एकनाथ शिंदे यांची धनु रास आहे, त्यामुळे त्यांची मैत्री जुळते. हे एकमेकांना लाभदायक ठरू शकतात, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यावर ज्योतिषतज्ज्ञांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची रास कुंभ आहे, तर एकनाथ शिंदे यांची रास धनु आहे, त्यामुळे यांची कुंडली जुळते. ते एकमेकांचे गुण जुळतात. यावेळी त्यांचे सर्व गृह जुळून आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. तर दुसरीकडे भाजपची (BJP) पत्रिका बघितली तर मिथुन लग्न आणि मीन रविची पत्रिका आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता ज्योतिषतज्ज्ञ सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com