Breaking: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सनला तात्पुरता जामीन

रोना विल्सनला जुलै 2018 मध्ये अटक करण्यात आली होती आणि सध्या तो UAPA (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्ह्यांसाठी न्यायालयीन कोठडीत आहे.
Breaking: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सनला तात्पुरता जामीन
Breaking: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सनला तात्पुरता जामीनSaam Tv

मुंबई: भीमा कोरेगाव (Bhima Koregoan) आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात मुंबईतील एनआयए न्यायालयाने आरोपी रोना विल्सनला वडिलांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. 2018 च्या भीमा कोरेगाव हिंसाचारातील 16 आरोपींपैकी एक रोना विल्सनला एनआयए कोर्टाने आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे आयोजित करण्यात आलेल्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

रोना विल्सनला जुलै 2018 मध्ये अटक करण्यात आली होती आणि सध्या तो UAPA (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्ह्यांसाठी न्यायालयीन कोठडीत आहे. विल्सनने आपल्या अर्जात म्हटले आहे की, त्याच्या वडिलांचे केरळमध्ये 18 ऑगस्ट 2021 रोजी निधन झाले. रिवाजानुसार, 16 सप्टेंबर 2021 रोजी केरळमधील चर्चमध्ये 30 व्या दिवसाच्या विधीसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Breaking: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सनला तात्पुरता जामीन
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर! पिकांमध्ये आठ दिवसांपासून गुडघाभर पाणी

परिस्थती लक्षात घेता न्यायालयाने रोना विल्सन ह्यांना दिलासा देत 2 आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. एनआयएने रोना विल्सनच्या वडिलांच्या मृत्यूसंबंधी विधी रोना विल्सनचा भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडूनही केली जाऊ शकते, असे नमूद करत अर्जाला विरोध केला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com