शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या तीन शिवप्रेमींचा 200 फुट दरीत कोसळून अपघात

या तिघांनाही महाडच्या ग्रामीण रूगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Accdient News
Accdient NewsSaam tv

पुणे – आज महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात सुरू आहे. शिवज्योत आणण्यासाठी भोर (Bhor) येथून रायगडच्या (Raigad) दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटारसायकल 200 फुट दरीत कोसळून अपघात (Accident) झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेतीनच्या सुमारा घडली असल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडला आहे. या तिघांनाही महाडच्या ग्रामीण रूगणालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. किरण सुर्यवंशी, केतन देसाई आणि प्रथमेश गरुड अशी या ३ तरुणांची नवे आहे.

हे देखील पहा -

एकाला किरकोळ लागले असल्याने प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे, तर दोघेजण तिथल्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. महाड औद्योगिक वसाहत पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले असल्याचे तिथल्या स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com